आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : निर्भयावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही कैदी आता तणावात आहेत. कारण - लवकरच आपल्याला फासावर लटकवले जाईल याची चाहूल त्यांना लागली आहे. तिहार तुरुंग प्रशासनाच्या तयारीमुळे चौघांच्या चेहऱ्यांवर भीती स्पष्ट दिसते आहे. गुरुवारपासून चारही कैद्यांची दिवसातून दोन वेळा डॉक्टरकडून तपासणी होत आहे. मागील पाच दिवसांत कैद्यांचे वजन घटले आहे. रक्तदाब मात्र सामान्य आहे. अक्षय, मुकेश, पवन आणि विनय या चारही कैद्यांना पूर्वीप्रमाणे भूक आता लागत नाही.
अक्षयचे वजन ५ दिवसांत ५५ वरून ५२ किलो, तर पवनचे ८२ वरून ८१ किलो झाले आहे. मुकेशचे वजन मात्र ६७ किलो कायम आहे. तिन्ही कैद्यांचा रक्तदाब सामान्य आहे. जेल-४ च्या कोठडीतील विनयची प्रकृती मात्र बिघडली आहे. गेल्या १५-२० दिवसांत त्यांची तब्येत बरीच ढासळली आहे. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणारा विनय हा एकमेव कैदी आहे. नंतर मात्र त्याने हा अर्ज मागे घेण्याचा अर्ज दिला होता. सर्वाधिक भीती अक्षय आणि मुकेशला वाटते आहे. पवनचे अल्पवयीनसंबंधी एक प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्याला वाटते आहे की त्याला फाशीवर लटकवणे अवघड जाईल. दरम्यान, तिहार प्रशासनाने स्पष्ट केले की, निर्भया प्रकरणाशी संबंधित कसलेही प्रकरण न्यायालयात प्रलंबित नाही. तुरुंगातील सूत्रांच्या मते, अक्षय, मुकेश आणि पवन हे चौघेही एकाच कोठडीत आहेत आणि त्यांच्याकडून काम करवून घेणे थांबवले आहे. दिवसभर ते आपसात गप्पा मारतात. यापैकी एका कैद्याने सांगितले, की विनयने दयेचा अर्ज केला नसता तर तिहार प्रशासनाने घाई केली नसती.
११ फास तिहारमध्ये पोहोचले, वजनानुसार डमीवर सराव
निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीवर लटकवण्यासाठीचे ११ फास तिहार तुरुंगात पोहोचले आहेत. मंगळवारी सकाळी फाशीगृहात कैद्यांच्या वजनानुसार पोत्यात वाळू भरून फाशीची तयारी करण्यात आली. तिहार तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मीरत जेलचे जल्लाद पवन यांनी फाशी देण्याची तयारी केली आहे. आता डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर मीरत येथून जल्लादाला बोलावले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.