आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Thousands Of Cases Against Ecommerce Websites Like Flipkart And Others For Low Quality Products

ऑनलाइन शॉपिंगमध्ये विकले जात आहे खराब आणि बनावट सामान, कुणाला 14000 रू बनावट शूज तर कुणाला मोबाइल ऐवजी मिळाले साबणाचे तुकडे,

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - आजकाल लोकांना ऑनलाइन शॉपिंगद्वारे हवी ती वस्तू घरबसल्या मिळते. त्यासाठी दुकानात भटकण्याची गरज राहिली नाही. परंतू ऑनलाइन शॉपिंगमध्ये खराब आणि नकली वस्तू विकल्या जात आहे. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अजमेर येथील प्रकाश डेव्हिड यांनी फ्लिपकार्ट या ऑनलाइन सेलिंग कंपनी कडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल मागवला होता. पण मोबाइल खराब असल्याचे आढळले. त्याची इंटरनेट सेवा एका महिन्यात बंद झाली. याबाबत डेव्हिडने सर्व्हिस सेंटर आणि ग्राहक सेवा केंद्रावर डझनभर तक्रारी केल्या होत्या. परंतू परिणाम मात्र शून्य निघाला. त्यानंतर डेव्हिडने ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. सुनावणीनंतर ग्राहक मंचामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईलची किंमत आणि मानसिक आणि आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. 

 

ऑनलाइन शॉपिंगमध्ये विकले जात आहे खराब आणि बनावट सामान
ऑनलाइनद्वारे मागविले गेलेले सामान खराब निघण्याचे हे एकमात्र प्रकरण नाही. देशभरात अशा अनेक तक्रारी येत आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने विविध ऑनलाइन विक्रेता कंपन्यांना निर्देश दिले की विक्री करत असलेले सामान मोठ्या ब्रँडची नक्कल नसतील याची खात्री करावी. देशभरात अशा अनेक धक्कादायक घटना उघड झाल्या आहेत. लहान आणि मोठ्या ऑनलाइन कंपन्यांकडून वेबसाइट्सवर बनावट, जुने आणि खराब वस्तू विकल्या जात आहेत. 

 

14000 रू शूज निघाले बनावट 
हिसार येथील मनिंद्र यांनी myntra.com येथून Adidas कंपनीचे 13999 शूज विकत घेतले होते. पण मिळालेल्या शूजवर बनावट लोगो होता. ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केल्यावर कंपनीवर शूजचे पैसे रिफंड करण्यासोबतच 2500 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

 

मोबाइल ऐवजी मिळाले साबणाचे तुकडे
मुंबईच्या वैभव कंबळेने फ्लिपकार्टकडून 14 हजार रुपयांत सॅमसंगचे 2 मोबाइल मागविले होते. पण पॅकेटमध्ये साबणाचे तुकडे निघाले. वैभवने तक्रार केली असता कंपनीने त्याला मोबाइल देण्याचे आश्वासन दिले. परंतु नंतर फोनवर उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. अखेर वैतागून वैभव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...