आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वर्धा- माणुसकीला काळिमाफासणारी घटना जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील नंदोरी चौरस्त्याजवळ घडली.या घटनेच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले.
नंदोरी चौरस्त्याजवळ दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास विकेश उर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे (वय 28 वर्षे (रा. दारोडा) या आरोपीने हिंगणघाट येथील तुळसकर महाविद्यालयात तासिका तत्वावर शिकवणी करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडल्याने, या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे या तीन शहरात बंदची हाक देण्यात आली होती. नागरिकांनी या बंदला यशस्वीरित्या पांठिबा दिल्याने शांततेपुर्ण वातावरणात बंद पाळण्यात आला.
माजी आमदार राजू तिमांडे आमदार समीर कुणावार ,अतुल वांदिले,सुधीर कोठारी व किरण उरकांदे यांच्या नेतृत्वात आज(दि 4 फेब्रुवारी) रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नंदोरी चौरस्त्या जवळून राजकीय पक्षाचे नेते,शाळकरी विद्यार्थी - विद्यार्थीनी, शिक्षका-शिक्षक, शहरातील नागरिक रस्त्यावर उतरुन पीडित तरुणीला वेळेत न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी सोबतच खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा याकरिता हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते.
या आंदोलनात शाळा, महाविद्यालय व व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवून सर्वांनी एकत्र येऊन पीडित तरुणीला न्याय देण्याचा प्रयत्न केला.या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून,सर्वत्र एकच आवाज ऐकू येत होता,आरोपीला 'फाशी द्या फाशी द्या ' या आवाजाने हिंगणघाट शहर हादरुन गेले होते.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकीची मनसे कडून मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी पोलीस स्टेशन कडे मोर्चा काढण्यात आला. हिंगणघाट शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असल्याने, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असून,नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी प्राध्यापिका असलेल्या तरुणीवर पेट्रोल टाकून जाळले असल्याने, सोबतच नंदोरी चौरस्त्याजवळ येणाऱ्या प्रत्येक महिलांची सुरक्षा व्यवस्था व्हावी याकरीता त्या ठिकाणी पोलीस चौकीची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून,ते निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, सामाजिक संघटना आल्या एकत्र
पीडित तरुण असलेल्या शिक्षेकेला पेट्रोल टाकून पेटविले असल्याने, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी या करिता वर्धेतील सामाजिक बांधिलकी जापणाऱ्या अनेक संघटना एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा मध्ये शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी पीडित तरुणीला न्याय मिळावा याकरिता मोर्चात सहभागी झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.