आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Thousands Of Creatures Survived With The Warning Of A 53 year old Man With A Stroke

पायाने अधू असलेल्या 53 वर्ष्यांच्या व्यक्तीच्या सतर्कतेने वाचवले हजारोंचे जीव, रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहचण्यास झाला असता थोडाही उशीर घडली असती मोठी दुर्घटना.......

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क -पायाने अधू असलेल्या एका  व्यक्तीने वाचवले अनेकांचे जीव. घटना आहे कर्नाटक येथील उडपी गावाची. ५३ वर्षीय  कृष्ण पुजारी आपल्या दैनंदिन दिनचर्ये प्रमाणे फिरावयास निघाले होते. त्यांना डॉक्टरांनी तास सल्ला दिला होता. जेणेकरून त्यांच्या पायाची समस्या लवकर दूर होईल. ते रेल्वे ट्रॅक जवळून फिरत असतांना अचानक त्यांची नजर ट्रॅकला असलेल्या तड्यावर गेली. ते विचारच करत होते काय करता येईल तेवढ्यात एक रेल्वे भरधाव  वेगाने त्यावरून गेली. रेल्वे गेल्याने तडा आणखी वाढला.त्यांनी जास्त विचार न करता रेल्वे ऑफिसचा रास्ता पकडला जवळपास 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे ऑफिस पर्यंत ते लावकरत लावकर पोहचले.

 

त्यांनी दिलेल्या माहिती ची तात्काळ दखल रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली व त्यामार्गे जाणाऱ्या सर्व रेल्वे थांबवण्याचे आदेश दिले. एक रेल्वे जवळपास 7 किलोमीर अंतरावर तर दुसरी 16किलोमीटर अंतरावर असतांनाच त्यांना थांबविण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने अधिकाऱ्यांना तिजाग दाखवली. रुळांचे काम व्यवथित झाल्यानंतर रेल्वे सुरळीत धावू लागली. या व्यक्तीच्या सतर्कतेने वाचले अनेकांचे जीव.    

 

अश्या प्रसंगी आपण काय कराल 
- असा प्रसंग आपल्या निदर्शनास आल्यास आपण याची माहिती आपण स्टेशन मास्तर किंवा रेल्वे पोलिसांना देऊ शकतात. आपल्या सतर्कतेने वाचू शकतात लाखोंचे प्राण 
- आणखी सुरक्षिततेसाठी आपण 182, मेडिकल इमर्जन्सी, स्वच्छता, अन्नपुरवठा विभाग, कोच मेंटेनन्स साठी 138, रेल्वे संपर्क आणि सेवांसाठी, पीएनआर स्टेटस , रेल्वे वेळापत्रक, बैठक व्यवस्थे संदर्भात चौकशी या साठी आपण 139 या क्रमांकांवर कॉल करू शकता  

बातम्या आणखी आहेत...