आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलूतून साईंची जन्मभूमी पाथरीकडे ९ ला निघणार हजारो भाविकांची दिंडी, नगराध्यक्ष बोराडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सेलूच्या ऐतिहासिक दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन
  • पाथरीत हाेणार स्वागत : साईमंदिरात होणार महाआरती

सेलू - परभणी जिल्ह्यातील पाथरी हीच श्री साईबाबांची जन्मभूमी असून यासाठी पाथरीकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी (दि. ९ फेब्रुवारी) सेलू ते पाथरी ऐतिहासिक पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी बुधवारी (िद.पाच) नगर परिषदेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्ष बोराडे म्हणाले की, पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी आहे. या संदर्भात पाथरी येथील नागरिकांनी लढा उभा केला आहे. पाथरीकरांनी सुरू केलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सेलू व परिसरातील नागरिकांच्या वतीने रविवारी भव्य व ऐतिहासिक पायी दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडीस या परिसरातील खेड्यांमधील भक्त गण व महिला भक्तगणांचाही सहभाग राहणार आहे. तसेच दिंडीमध्ये सर्व आबालवृद्ध देखील सहभाग घेणार आहेत. 

दिंडी असेल भव्यदिव्य

सेलू येथून निघणाऱ्या भाविकांच्या दिंडीमध्ये रुग्णवाहिका, डॉक्टर व सेवापथकासह सर्व सोयी असणार आहेत. दिंडीचे स्वरूप पुढे साई व सद्गुरु यांचा रथ, साई जन्मभूमी पाथरी व सद्गुरु स्थान सेलूच्या २९ पुराव्यांचा चित्ररूप देखावा, ऊंट,घोडे, १५० तोफांची सलामी, टाळ मृदंग, भजन कीर्तन ध्वज पताका जागोजागी स्वागत नाश्तापाणी, शरबत, भोजनाचे आयोजन असे अभूतपूर्व  भव्यदिव्य स्वरूप असणार आहे. पाथरीत हाेणार स्वागत : साईमंदिरात होणार महाआरती


पाथरी येथे ही दिंडी पाेहाेचल्यावर दिंडीचे साई स्मारक समिती पाथरीतर्फे  भव्य स्वागत व सायं.६ वा. श्री साई मंदिर येथे महाआरती होईल. साईंवरील भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. परत येण्यासाठी प्रत्येक भाविकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व नियोजनास्तव विविध समित्यांचे गठण श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर सेलू व श्री साई मंदिर पाथरी येथे करण्यात आले आहे. तसेच विविध वारकरी मंडळ, कीर्तन विद्यालय, गुरुकुल येथे बैठका घेऊन करण्यात आले. सर्वच क्षेत्रातील बहुजन समाजाचा यांस पाठिंबा लाभला आहे. दि.९ फेब्रुवारी रविवारी रोजी सकाळी ७ वाजता साईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात महाआरती होऊन सेलू येथून दिंडी पाथरीकडे प्रस्थान करणार असल्याचे  नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सांगितले.बातम्या आणखी आहेत...