आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेहरान : युक्रेनच्या प्रवासी विमानाला पाडण्यात आल्याच्या विरोधात इराणची राजधानी तेहरानमध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली. त्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. विद्यार्थ्यांनी चार विद्यापीठ शरीफ इंडस्ट्रियल, आमिर कबीर, अलामेह व तेहरान विद्यापीठाच्या बाहेर धरणे धरले होते. इराणने युक्रेनच्या विमानाचे नुकसान केले नसल्याचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. वास्तविक इराणने उशिरा का होईना चूक कबूल केली. दुर्घटनेत १७६ जणांचा मृत्यू झाला होता. विद्यार्थी मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येत असल्याचे सांगण्यात आले. परंतु सायंकाळ होत असतानाच निदर्शने उग्र झाली व रात्रभर विद्यार्थी रस्त्यावर ठिय्या धरून होते. विद्यार्थ्यांनी सुप्रीम कमांडर इन चीफ अयातुल्ला अल खाेमेनी यांच्या राजीनाम्याची व खोटारड्यांना मृत्युदंडाची मागणी करत होते. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात इराणमधील ब्रिटनचे राजदूत रॉब मॅकेयरदेखील सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांना तासभर ताब्यात ठेवले. या कृतीचा ब्रिटनने विरोध दर्शवला.
अमेरिका : ट्रम्प यांनी केले समर्थन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनाचे समर्थन केले. त्यांनी इंग्लिश व पर्शियन भाषेतून ट्विट केले. इराणमधील धाडसी जनता, मी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तुमच्यासोबत उभा आहे. माझे सरकार तुमच्यासोबत राहील. तुमचे धाडस प्रेरक आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
राष्ट्रपतींचे तपासात मदतीचे आवाहन
इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी युक्रेन विमान दुर्घटनेवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशी चर्चा केली. या घटनेत कॅनडातील ६३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी इतर देशांची मदत घेऊ इच्छितात. प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार व्हायला हवे, असे त्यांनी म्हटले.
तणावादरम्यान....कतारचे शेख तमीम इराणला पोहोचले
अमेरिका-इराण यांच्यात तणाव कमी करण्यासाठी कतारचे आमिर शेख तमीम तेहरानला पोहोचले. त्यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेतली. स्थानिक मीडियाने ही माहिती दिली. कतार अमेरिकेचा निकटवर्तीय देश आहे. कतारमध्ये अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहे. कतार-इराण यांच्यातील संबंधही बळकट आहेत. उभय देशांत सामायिक गॅस क्षेत्र आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशीदेखील इराण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, आम्ही क्षेत्रीय संघर्षात कोणत्याही पक्षात सहभागी होणार नाहीत. केवळ शांततेसाठी प्रयत्न करू. आमची जमीन युद्धासाठी देणार नाही.
इराणने संयुक्त राष्ट्राला पत्र पाठवले- अमेरिका देत नाही व्हिसा, हस्तक्षेप करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.