आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Thousands Of Husbands From Across The Country Demanded The Formation Of A Male Commission At Jantar Mantar

देशभरातील हजारो पत्नी पीडित पुरष जंतर-मंतरवर जमले, पुरुष आयोग बनवण्याची सरकारकडे केली मागणी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : पत्नीचा छळ केल्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोग तसेच कोर्टासह अनेक संस्था आहेत, मात्र पतीचा छळणे, त्यांना खोट्या केसमध्ये फसवणे यासाठी एकही पुरुष आयोग नाही. हीच मागणी घेऊन देशभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या पीडित पतींनी बुधवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन केले. पत्नी पीडित पुरुषांसाठीदेखील एक पुरुष आयोग बनववण्याची मागणी पुरुषानी सरकारकडे केली. 
 
भास्करने 18 ते 20 पीडित पतीसोबत संवाद साधला. यातील बहुतांश पुरुषांनी सांगितले की, घरात माहेरच्या मंडळींचा हस्तक्षेप बंद झाला तर 80 टक्के कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील

हुंडा, भांडण, मारहाण यांसारख्या खोट्या तक्रारी दाखल केल्या... 
बंगळुरू येथील आयटी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर असलेल्या मनप्रीत सिंह भंडारीने सांगितले की, त्यांचे लग्न 2009 मध्ये झाले होते. काही दिवसांनंतरच कौटुंबिक वाद होऊ लागले. गोष्ट एवढी वाढली की, हे लग्न आता पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतर पत्नी 15 महिन्यांच्या बाळाला घेऊन न सांगता माहेरी निघून गेली. तिथे गेल्यावर आपल्या आईच्या सांगण्यावरून हुंडा, भांडण, मारहाण यांसारख्या खोट्या केस दाखल केल्या. महिन्यात 4 ते 5 वेळा कोर्टाच्या चकरा माराव्या लागायच्या त्यामुळे कंपनीने नोकरीवरून काढून टाकले. 

प्लॉट नावावर केला नाही तर पत्नीने 6 केसमध्ये अडकवले...  
मदनगीरचे निवासी स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वीर सिंहचे लग्न 2006 मध्ये झाले होते. त्याला तीन मुले आहेत. त्याने सांगितले की, 2015 मध्ये त्याने एक प्लॉट खरेदी केला होता. हा प्लॉट पत्नीच्या नावावर करण्याची तिच्या माहेरच्यांनी मागणी केली. पण परिस्थिती पाहून वीर सिंह प्लॉट पत्नीच्या नवे करू शकला नाही. यामुळे पत्नी 2 मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. तर एका मुलीला इकडेच सोडले. माहेरी जाऊन तिने बदला घेण्यासाठी हुंडा, मारहाण आणि शिक्षण यांसह 6 खोट्या केस दाखल केल्या. 


'सासरच्या मंडळींनी दिलेल्या 250 धमक्यांचे ऑडियो आहे
त'
रोहिणी येथील निवासी सुधांषु गौतमचे लग्न 25 नोव्हेंबर 2016 मध्ये झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतरच पत्नी म्हणाली की, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे. नसेल तर मी तुमचा हक्क तुम्हाला मिळवून देईल. यावर सुधांषु म्हणाला, मोठ्या भावाचे लग्न होऊन 10 वर्षांपेक्षा जास्त झाली आहेत, त्यांनी अजून आई आवडिलांना हक्क नाही मागितला, तर मी कसा मागू शकतो. याच गोष्टीवरून भांडण होऊ लागले. पत्नीच्या आईने तिला बोलावून घेतले आणि गर्भपात, हुंडा, मारहाण यांसारख्या अर्ध्या डझनपेक्षा अधिक खोट्या केसेसमध्ये अडकवले. त्याने सांगितले, पत्नीच्या कुटुंबियांच्या  धमक्यांचे सुमारे 250 पेक्षा जास्त ऑडियो त्याच्याकडे आहेत.