आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडाऱ्यात ६ हजार लोकांना एकाच वेळी दिले जेवण, ट्रॅक्टर-ट्रॉली भरून भाजी व बुंदी वाटली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंड - मध्य प्रदेशातील भिंडजवळील मेहगावातील गायत्री परिवाराच्या वतीने ५१ कुंडाच्या महायज्ञाचा समारोप झाला. या वेळी ८ हजार चौरस फुटांच्या मैदानात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ६हजार लोकांनी ६ रांगात बसवण्यात आले आणि त्यांना एकाचवेळी प्रसादाचे वाटप करण्यात आला. प्रत्येक रांगेत एक हजार लोक होते. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांना ट्रॅक्टर-ट्रॉली भरुन बुंदी व भाजी वाटण्यात आली. बुंदी वाटण्यासाठी खोरे वापरण्यात आले होते.