आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कपलने केला शेकडो तरुणींवर बलात्कार, मोबाईलमध्ये सापडले हजारो अश्लील videos; ड्रग्स देऊन बनवायचे शिकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत 2 महिलांवर बलात्कार प्रकरणी एक डॉक्टर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अटक करण्यात आली. पंरतु, चौकशी दरम्यान या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. या कपलच्या घरात हजारो पॉर्न व्हिडिओ सापडले आहेत. हे व्हिडिओ त्यांनी अडकवलेल्या शेकडो पीडित तरुणींचे होते. आपल्या चांगल्या लुक्सचा गैरफायदा घेत ते तरुणींना घरी बोलवायचे आणि त्यांना ड्रग्स देऊन त्यांचे शोषण करत होते. पोलिस आता त्या व्हिडिओमध्ये असलेल्या सर्वच महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 


अमेरिकेत सर्जन असलेला 38 वर्षीय डॉ. ग्रँट विल्यम रॉबिच्युक्स आणि त्याची गर्लफ्रेंड सेरिसा लॉरा रिली (31) वर दोन महिलांनी बलात्काराचा आरोप लावला. या महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विल्यम आणि लॉरा त्यांना एका क्लबमध्ये भेटले होते. फूस लावून घरी नेल्यानंतर या दोघांनी त्यांच्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडिओ बनवला. पोलिसांनी त्यांच्या घरात जाऊन चौकशी केली तेव्हा या कपलने एक-दोन नव्हे, तर शेकडो महिलांचे शोषण केले असा खुलासा झाला. आरोपी डॉक्टर एका टीव्ही रियालिटी शोमध्ये झळकला होता. त्याने या शोमध्ये लोकांना डेटिंग आणि रिलेशनशिपवर सल्ले दिले होते. 


काय म्हणाले अधिकारी...
ऑरेंज काउंटी जिल्ह्याचे सरकारी वकील टोनी रॅकॉकस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की त्या दोघांचे फोन अजुनही अॅक्टिव्ह आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये तपास अधिकाऱ्यांना हजारो अश्लील व्हिडिओ सापडले. हे व्हिडिओ त्यांनी शेकडो महिलांवर बलात्कार करून तयार केले होते. आता हे सर्व व्हिडिओ पाहून त्या महिलांचा शोध घेतला जात आहे. पीडित महिलांचे व्हिडिओ पाहिल्यास त्या नशेत इतक्या तर्र होत्या की त्या होकर किंवा नकार देण्याच्या स्थितीतही दिसत नाहीत. त्यांच्याकडून सुद्धा तक्रार नोंदवून कपल विरोधात आणखी बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातील. तूर्तास दोघांनाही प्रत्येकी 72 लाखांच्या बॉन्डवर जामीन देण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...