आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भयाच्या अंधारात आज पेटणार हजारो रातरागिणींच्या मशाली'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाईटवॉकचा मार्ग... - Divya Marathi
नाईटवॉकचा मार्ग...

अमरावती : मौन सोडू चला बोलू या अभियान अंतर्गत दैनिक दिव्य मराठीने केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत असंख्य रातरागिणी अत्याचाराच्या काळोखाविरोधात मशाली पेटविणार आहे. स्थानिक राजकमल चौकात एकत्र येत असंख्य महिला रविवार २२ डिसेंबरच्या रात्री नाईट वॉकमध्ये सहभागी होणार आहे. महाराष्ट्रातील २२ शहरांसह अमरावतीत ही नाईट वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

२२ डिसेंबर म्हणजे वर्षातली सगळ्यात मोठी रात्र. या दिवशी महिला घराबाहेर पडून, नाईटवॉक' करणार आहेत. या नाईटवॉक करिता शहरातील महिला रात्री ९ वाजेपर्यंत राजकमल चौकात एकत्र येणार आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारे पथनाट्य या ठिकाणी सादर केले जाणार आहे. स्त्री आणि तिचे विश्व या विषयावर लिगल स्केअर मल्टीपरपज असोसिएशन आणि महिलांच्या समस्यांना घेऊन रुख्मिणी नगरातील रुख्मिणी महिला मंडळाचे सदस्य पथनाट्य सादर करणार आहे. सोबतच थांगता व स्वयंसिद्धा ग्रुपच्या वतीने या वेळी महिलांना आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे. या वेळी पाच कष्टकरी महिलांच्या हस्ते मशाल पेटवून नाईटवॉकला सुरूवात केली जाणार आहे. राजकमल चौकातून निघालेला नाईटवॉक रेल्वे पूल, रेल्वे स्टेशन, इर्विन चौक, मालवीय चौकातून जयस्तंभ चौक येथे पाेहोचणार आहे. जयस्तंभ चौक येथे नाईटवाॅकचा समारोप केल्या जाणार आहे. दिव्य मराठीच्या या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांचे वाहन पार्किंग करण्याकरिता महापालिकेने नेहरू मैदान उपलब्ध करुन दिले आहे. महापालिका आयुक्त संजय निपाने यांनी याकरिता भरीव मदत केली. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडून वैद्यकीय सुविधा प्राप्त करुन दिली जाणार आहे.

शहर कोतवाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी राजकमल चौक तसेच नाईटवॉक दरम्यान पोलीस सुरक्षा प्रदान करीत भरीव मदत केली आहे. नाईटवॉक दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले व त्यांचे सहकाऱ्यांकडून वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे.

या शिवाय युवा संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पवित्रकार यांच्याकडून नाईटवॉकमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांकरिता पाणी व चहाची व्यवस्था दिली जाणार आहे. कधी पोटच्या मुलीवर बलात्कार होतो, तर कधी नराधमांच्या तावडीतून आईही सुटत नाही. गर्भात ती असुरक्षित, रस्त्यावर एकाकी आणि घरातही अगतिक असे चित्र आहे. रात्री घराबाहेर पडू नका. सातच्या आत घरी पोहोचा. अशी बंधने स्त्रीवरच लादली जाते. म्हणून ही व्यवस्थाच लाथाडण्यासाठी नाईट वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्य मराठीने सुरू केलेल्या उपक्रमाला शहरात विविध संघटना, संस्था, महिलांचे ग्रुप, क्लब यासह असंख्य महिलांकडून मोठा प्रतिसाद लाभला असून,नाईटवाॅकमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी हाेण्याचा निर्धार विविध महिला संघटना आणि संस्थांनी केला आहे.

संपर्कासाठी वार्ताहरांचे भ्रमणध्वनी क्रमांक :
 
अनुप गाडगे - ९८८१६८६८४४ वैभव चिंचाळकर - ९८२२२८२७१३ सतीश भटकर - ९८५०८४३४४० प्रेमदास वाडकर - ९३७१५५४४६७ जयश्री देशमुख - ९३४००६१८३५ मनीष जगताप - ९८५०३२००४१

राजकमल चौकात एकत्र आल्यानंतर रात्री ९.३० वाजता नाईटवाॅकला सुरूवात होणार आहे.

येथे पार्कींग राजकमल चौकात असलेल्या नेहरु मैदान येथे वाहनांकरिता पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. नाईटवॉकमध्ये सहभागी होण्याकरिता आलेल्या महिलांनी त्यांची वाहने नेहरू मैदान येथे पार्कींग करावयाची आहे. आपपल्या वाहनांना नीटपणे लॉक केले की नाही, याची खात्री करुनच स्टेजकडे यावे.

नाईटवॉकचा मार्ग... 
 
हा नाईटवॉक रेल्वे पूलावरून रेल्वे स्टेशन चौक, इर्वीन चौक, मालवीय चौक मार्गे जयस्तंभ चौकात येईल.
जयस्तंभ चौकात नाईटवॉकचा समारोप केल्या जाणार आहे.

कार्यक्रमाची सुरूवात करणार या पाच महिला.... 

1. तुळसाबाई तिखिले महिला वाहतुक पोलीस

शहर वाहतूक शाखेला कार्यरत असलेल्या तुळसाबाई तिखिले या मागील २७ वर्षांपासून अमरावती पोलिस दलात सेवा बजावत आहेत. सद्या वाहतूक शाखेला कार्यरत असल्यामुळे उशिरा रात्रीपर्यंत त्या रस्त्यावर कर्तव्य बजावत असतात.

2. अरुणा पानतावणे-कॅटरिंगमध्ये काम करणारी महिला

मी जवळपास मागील २० वर्षांपासून कॅटरिंगचे काम करते. शहरासह शहराबाहेरही कधी कधी ऑर्डरनुसार कामाला जावे लागते, परंत आमची सर्व काळजी आमची कंपनी घेते. आमच्या कामाचे स्वरुप दिवस व रात्र असे आहे, परंतु इतक्या वर्षांमध्ये एकही वाईट अनुभव आला नसल्याचे अरुणा पाणतावणे यांनी सांगितले.

3. सफीया खान अंगणवाडी सेविका, महिला कार्यकर्ती

अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. बाहेर कार्य करताना महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. १५ वर्षांपासून अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी व जनवादी महिला संघटनेचे कार्य करीत आहे. महिलांसमोर संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सफीया खान म्हणतात.

4. उषा कांबळे - परिचारिका

मी गेल्या पाच वर्षांपासून शहरातील विविध हॉस्पिटल्समध्ये काम करीत आहे. ड्युटी शिफ्ट वाईज असल्याने दिवस व रात्र असे काम करावे लागते. दवाखान्यामध्ये रुग्णांसह त्यांच्या पुरुष नातेवाईकांकडून कधी कधी त्रास होतो. त्याकडे दुर्लक्ष करीत तर कधी खडे बोल सुनावत त्यांना मार्ग दाखवावा लागतो,असे कांबळे म्हणतात.

5. योगिनी अर्डक पत्रकार

मी मागील १६ वर्षांपासून प्रिंट मिडीयामध्ये काम करीत आहे. इतकी वर्षे फिल्डवर काम करीत असताना कोणताही त्रास जाणवला नाही. पत्रकार म्हणून कितीही निर्भय व निडरपणे काम करीत असली, तरी काही वर्षांपुर्वी घडलेल्या घटनेने आपण प्रथम महिला आहोेत याची जाणीव करून िदल्याचे याेगिनी अर्डक म्हणतात.