Home | Khabrein Jara Hat Ke | threat to job peoples appealing this lady officer to arrest them

या पोलिस महिलेचे सौंदर्यच बनले शत्रू, डिपार्टमेंटने काढले विचित्र फर्मान, लोक स्वतः अटक व्हायला तयार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:13 PM IST

सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे बंद केले नाही, तर नोकरी गमवावी लागेल असे तिला सांगितले आहे.

 • threat to job peoples appealing this lady officer to arrest them

  बर्लिन - जर्मनीच्या अॅड्रिनी कोलेसजर नावाच्या या महिला पोलिस ऑफिसरचे सौंदर्यच तिच्यासाठी त्रासदायक ठरत आहेत. मॉडेल पोलिस ऑफिसर नावाने प्रसिद्ध झालेल्या अॅड्रिनीला आता पोलिस डिपार्टमेंटने इशारा दिला आहे. सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे बंद केले नाही, तर नोकरी गमवावी लागेल असे तिला सांगितले आहे. अॅड्रिनीने तिच्या सुंदर फोटोंनी इन्स्टाग्रामवर खळबळ माजवली होती. जवळपास दोन वर्षात अॅड्रिनीचे लाखो फॉलोअर्स बनले, सोशल मीडियावर तर लोक तिला मॅडम मला अटक करा असे म्हणू लागले होते.


  वर्कआउटचे फोटो झाले व्हायरल
  अॅड्रिनी सर्वात जास्त वर्कआऊटचे फोटो अपलोड करते. तिच्या सिक्स पॅकने अनेकांना प्रोत्साहीत केले आहे. पण पोलिस डिपार्टमेंटला हे आवडले नाही. डिपार्टमेंटने तिला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, बिकिनी फोटोज सोशल मीडिया अपलोड करणे बंद करावे. एक तर पोलिसांत राहा अन्यथा इन्स्टाग्राम चावला असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. तिला विचार करण्यासाठी ठरावीक वेळ देण्यात आला आहे. डिपार्टमेंटचे असे म्हणणे आहे की, अॅड्रिनीचे तिच्या कामावर लक्ष नाही.


  दीड वर्षातच वाढले लाखो फॉलोअर्स
  34 वर्षांच्या अॅड्रिनीच्या लोकप्रियतेचा अंदाज दोन वर्षाच इन्स्टाग्रामवर तिच्या वाढलेल्या फॉलोअर्सवरून लावता येऊ शकतो. दो वर्षात तिच्या इन्स्टाग्राम फॅन्सचा आकडा 90 हजारांवरून 5 लाखांच्या पुढे गेला आहे. अॅड्रिनीचे फोटो आणि फिटनेस लोकांना प्रचंड आवडते. अनेकांनी तिला तिच्या हातून तुरुंगात जायला तयार असल्याचे म्हटले आहे.


  आधी म्हटले होते, बॉसला काही हरकत नाही
  अॅड्रिनी सर्वात आधी जेव्हा इंटरनेट सेंसेशन बनली होती तेव्हा ती म्हणाली होती की, तिच्या बॉसना असे फोटो पोस्ट करण्यावर काहीही हरकत नव्हती. पण आता तिचे सौंदर्य जॉबसाठी धोकादायक ठरत आहे.


  सौंदर्याचे राज..
  अॅड्रिनीने तिच्या फिटनेस आण सौंदर्यामागे स्पोर्ट्स आणि हेल्दी डाएट असल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले की, शिफ्टनंतर ती आठवड्यातून पाच दिवस वर्कआऊट करते. महिलांनी फिटनेसबाबत गंभीर व्हावे म्हणून पोटो पोस्ट केल्याचे ती सांगते. तिने 2015 मध्ये बॉडी बिल्डिंग स्पर्धेतही सहभाग घेतला होता.

 • threat to job peoples appealing this lady officer to arrest them
 • threat to job peoples appealing this lady officer to arrest them
 • threat to job peoples appealing this lady officer to arrest them

Trending