आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवज्योतसिंग सिद्धूला डॉक्टरांनी केले अलर्ट, म्हणाले-पाच दिवस महत्त्वाचे आहेत.. गमवावा लागू शकतो आवाज.. हे आहे कारण..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - पंजाब सरकारमधील मंत्री असलेले काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत. पण त्यांच्या चाहत्यांसाठी एक दुःखाची बातमी आहे. डॉक्टरांनी सिद्धू यांना आवाज जाण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरताना सिद्धूंना आवाज गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना 5 दिवसांच्या सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला आहे. 

Punjab's Local Government, Tourism and Cultural Affairs Minister Navjot Singh Sidhu has been advised complete rest for three to five days as he was "on the brink of losing his voice."

Read @ANI story | https://t.co/ZYEu0FTvbG pic.twitter.com/cjwErwQUOD

— ANI Digital (@ani_digital) December 6, 2018
काय झाले सिद्धूंना?
17 दिवसांत 70 रॅलींमध्ये सतत भाषण केल्याने सिद्धू यांना लिरिंगजाइटिस (व्होकल कॉर्ड्स चे प्रचंड नुकसान होने) नावाचा आजार झाला आहे. मेडिकल हेल्प घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आजार गंभीर असून आवाज गमावण्याचा धोका असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सिद्धू यांना तीन ते पाच दिवस सक्तीचा आराम करण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हेलिकॉप्टर आणि फ्लाइटमधील प्रवासाने सिद्धी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. 

 

काय असतो हा आजार?
डॉक्टरांच्या मते, जेव्हा शरीरात प्रचंड उत्साह असतो आणि मेंदू सतत शरिराला बोलण्यासाठी प्रेरणा देत असतो पण बोलायला गळा तुम्हाला साथ देत नाही तेव्हा त्याला लिरिंगजाइटिसचा आजार म्हणतात. म्हणजे शरीर किंवा मेंदू थकला नाही पण गळा थकला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...