आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांना धमकावले; खासदार चंद्रकांत खैरेंवर हाेणार कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वाळूज परिसरातील मंदिराचे अतिक्रमण पाडण्यासाठी गेलेले तहसीलदार रमेश मुनलाेड व अतिक्रमणविराेधी पथकास धमकावल्याप्रकरणी शिवसेनेचे स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कारवाईची शिफारस राज्य सरकारने केली अाहे. विधी व न्याय विभागाकडून ही माहिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात अाली.  


सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार अाैरंगाबाद परिसरात बेकायदा उभारण्यात अालेल्या प्रार्थनास्थळांचे बांधकाम हटवण्याचे काम हाती घेण्यात अाले हाेते. २९ अाॅक्टाेबर २०१५ राेजी वाळूज परिसरात बेकायदा उभारलेले एक मंदिर पाडण्यासाठी अालेल्या तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांना खैरेंनी धमकावल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केली हाेती. 

 

बातम्या आणखी आहेत...