Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Three-and-a-half hour fire in Narayanagawa foam godown

नारेगावातील फोम गोदामात साडेतीन तास अग्नितांडव

प्रतिनिधी | Update - Nov 06, 2018, 12:21 PM IST

सहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.

  • Three-and-a-half hour fire in Narayanagawa foam godown

    औरंगाबाद - नारेगाव कचरा डेपोपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या ३० बाय १०० फुटांच्या फोमच्या बंद गोदामाला सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन विभागाचे सहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.


    नारेगावात तीन लाइनमध्ये प्रत्येकी तीन अशी नऊ पत्र्यांची गोदाम आहेत. सय्यद साबेर यांच्या मध्यभागी असलेल्या फोमच्या गोदामाने सर्वप्रथम पेट घेतला. सर्व गोदामे एकमेकांना लागून चारही बाजूंनी बंद आहेत. त्यामुळे आग लागल्याचे लवकर लक्षात आले नाही. पत्र्याच्या बाहेर धुराचे लोट दिसू लागल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिस व अग्निशमन विभागाला कळवले. थोड्याच वेळात सिडको, चिकलठाणा आणि एमआयडीसीतील अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. फोमचा मोठा साठा असल्यामुळे आग लवकर आटोक्यात येत नव्हती. अखेर विशेष यंत्रणा असलेला बंब बोलावण्यात आला. त्यानंतर आग आटोक्यात आली.

    निष्काळजीपणा भोवला

    फोमच्या गोदामाच्या आजूबाजूला प्लास्टिक, पुठ्ठा, गोण्या असलेली गोदामे आणि दुकाने आहेत. मात्र, एकाही दुकानात अग्निशमन यंत्रणा बसवलेली नाही. शिवाय पत्र्याची गोदामे शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेली नाहीत. यापुढे निष्काळजीपणा करणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या जीवितास हानी पोहोचवणाऱ्या गोदाम चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक मळाळे यांनी दिली

Trending