आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत तर्रर्र तीन तरुणांनी पोलिस कॉन्स्टेबलसोबत केले गैरवर्तन, व्हिडीओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एका पोलिस कॉन्स्टेबलसोबत नशेत तर्रर्र असलेल्या तीन तरुणांनी हुज्जत घातल गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (ता.3) ही घटना घडली असून तिन्ही आरोपींच्या हातात मंगळवारी (ता.5) सायंकाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला अपशब्द वापरले. कॉन्स्टेबलच्या दुचाकीची किल्ली हिसकावून घेतली. एवढेच नाही तर रस्त्यावर गोंधळ घातला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

 

मुंबईतील निर्मल नगरात रविवारी ही घटना घडली. प्राजक्ता बिल्डिंगजवळ नशेत तर्रर्र असलेल्या तीन तरुणांनी दुचाकीवरून जात असलेल्या पंढरीनाथ रामू अलदर (वय-54) या कॉन्स्टेबल अडवले. कॉन्स्टेबलला जबरदस्तीने हेल्मेट परिधान करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर एकाने हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. यावेळी दुसरा शिविगाळ करत होता. या दरम्यान आरोपींनी कॉन्स्टेबलच्या दुचाकीची किल्लीही हिसकावून घेतली होती.
 
व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींना अटक..
कॉन्स्टेबल पंढरीनाथ अलदर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवन राठी, अशोक राठी आणि विश्वास राठी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. व्हि‍डीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना मंगळवारी मुंबईतील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...