आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये अपघातांची मालिका थांबेना..दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तीन जखमी एकाची प्रकृती गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी दुपारी झाला अपघात

यावल- यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होत तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी दुपारी हा अपघात झाला. विशेष म्हणजे तीन जखमींपैकी एक अवस्थेतच घटनास्थळाहून पसार झाला. दोघांना यावलला प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार दाखल करण्यात आले आहे.

 

शहरातील रहिवासी शेख रफीक शेख जान मोहम्मद (वय-48) हे आपल्या भिवंडी येथील नातेवाईक शेख आबिद शेख साबीर (वय-52) यांना घेऊन दुचाकीने (एमएच.19-एए 1739) यावलहून भुसावळकडे जात होते. त्याचवेळी भुसावळकडून एक अज्ञात दुचाकीस्वार आपल्या दुचाकीने (एमएच. 19- एएच 8324) शहरांत येत होता. दरम्यान भुसावळ नाक्याच्या जवळच दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये समोरील अज्ञात दुचाकी चालकाला डोक्यावर डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली व तो तेथून रक्तबंबाळ अवस्थेत भुसावळच्या दिशेने परत निघून गेला. तर रफिक शेख यांच्या डाव्या पायाला जबर मार लागला आहे. तसेच शेख आबीद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉ. परविन तडवी, पल्लवी सुरवाडे, संजय जेधे यांनी प्रथोमोपचार केले. नंतर दोघांना तत्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले. यापैकी शेख आबीद यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...