आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Three Cases Of Corona Virus A Month Ago In India; However, In The Last 48 Hours, 10 New Patients Were Admitted

भारतात एक महिन्यापूर्वी कोरोना विषाणूची तीन प्रकरणे; मात्र गेल्या 48 तासांतच 10 नवे रुग्ण दाखल झाले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक

नवी दिल्ली : चीनमधून बाहेर पडून जगभर धडकी भरवणारा कोरोना विषाणू आता भारतातही वेगाने पसरत चालला आहे. दोन दिवसांत १० नवे रुग्ण आढळले. मंगळवारी आग्रा येथे कोरोनाबाधित ६ लोक सापडले. सोमवारी दिल्ली, हैदराबाद आणि जयपूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. आग्रा येथे जे ६ रुग्ण सापडले, ते एक दिवस आधी दिल्लीत आढळलेल्या काेरोना रुग्णासोबात इटलीला गेले होते. या सहा जणांना एकाच व्यक्तीद्वारे बाधा झाली असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, ज्या विमानाने ही व्यक्ती आली त्याच्या क्रूचीही तपासणी झाली. केरळमध्ये तीन रुग्ण आढळले होते. ते आता पूर्णपणे बरे आहेत. अशा प्रकारे देशात कोरोनाची एकूण १३ प्रकरणे समोर आली आहेत.

दरम्यान, नोएडामध्ये एका मुलाच्या पित्याला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी येताच दोन शाळा बंद करण्यात आल्या. सोमवारी जी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली तोच हा पिता आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने आपल्या घरी शाळकरी मुलांना पार्टी दिली होती. 

मुंबई : मालेगावात चीनहून अालेल्या एका विद्यार्थ्याची तपासणी सुरू असतानाच अाणखी दाेन तरुणांना निरीक्षणाखाली ठेवले अाहे. नाशकात इटली व इराणहून अालेल्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह अाले.

 • राज्यात कोरोनाच्या ६ संशयित रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर ५१५ विमानांमधील ६१,९३९ प्रवाशांची तपासणी झाली.
 • राज्यात परदेशातील बाधित भागातून आलेल्या ४०१ पैकी ३१८ प्रवाशांना १४ दिवस निगराणीखाली ठेवले. १५२ जणांना आयसोलेशन वाॅर्डांत ठेवले आहेत.
 • इराणमध्ये अडकलेल्या काेल्हापूरच्या ३४ जणांच्या सुटकेची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

 • कोरोनावर उपाययोजनांसाठी कर्नाटक, तेलंगण, राजस्थान, दिल्ली आदी राज्यांत तयारी सुरू झाली आहे.
 • ७७ देशांत उद्रेक; पैकी ३८ देशांत गेल्या ५ दिवसांत व्हायरसचा संसर्ग
 • चीनमध्ये सुधारणा, इतर देशांत स्थिती बिघडली: चीनमध्ये ३३% उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. स्थिती पूर्वपदावर येण्यास ३ आठवडे लागणार.

जागतिक व्यवसायाला संसर्ग; ‘फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड’चा किताब चीनकडून हिरावणार

 • चीनच्या जीडीपी वृद्धिदराचा अंदाज ६% वरून ४.५%. ४० लाख नोकऱ्या गेल्या. ‘फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड’चा किताबही हिरावण्याची चिन्हे आहेत.
 • इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असो.ने म्हटले की, प्रवासी संख्या घटल्याने उद्योगास २.१४ लाख काेटींचा फटका.
 • चीनमधून वाहनांच्या सुट्या भागांचा पुरवठा पूर्णपणे ठप्प पडला आहे.
बातम्या आणखी आहेत...