आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदावर पडले विरजण; क्रिकेट खेळायला गेले होते 3 चिमुकले, बॉलला शोधताना लागला झटका, काही क्षणातच झाला कोळसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- होळीच्या आधीच ग्रेटर नोएडाच्या सेक्टर पाय-3 मध्ये असलेल्या वृंदा सोसायटीमध्ये राहणारे 3 मुलांच्या घरी दुखाचे सावट पसरले आहे. सोसायटीच्या सर्वंट क्वॉर्टरमध्ये राहणारे 3 मुले विजेच्या सब-स्टेशनमध्ये ट्रांसफॉर्मरच्या उघड्या तारांच्या विळख्यात सापडले. यात तिन्ही मुलांचे शरीर जळून कोळसा झाले. या दरम्यान ट्रांसफॉर्मरमध्ये आग लागली, लोकांनी आग विझवल्यावर मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मुले ट्रांसफॉर्मजवळ क्रिकेट खेळत होते, अचानक त्यांचा बॉल आत गेला आणि त्यालाच शोधण्यासाठी गेल्याने ही घटना घडली.


विभागाच्या हलगर्जीपणावर लोकांनी व्यक्त केला राग, प्रशासनाने दिले कारवाईचे आदेश 
या घटनेत सागर(8) रिंकू(13) आणि गोलू(9) या तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे तिन्ही चिमुकले एनपीसीएल सर्विस स्टेशनच्या जवळील प्राधिकरणाच्या सर्वेट क्वॉर्टरमध्ये राहत होते. बुधवारी दुपारी 1 वाजता ते तिघे सब-स्टेशनच्या जवळ क्रिकेट खेळत होते. त्यावेळी त्यांचा बॉल सब स्टेशनच्या आत गेली. त्यानंतर बॉलला शोधण्यासाठी रिंकू, गोलू आणि सागर सबस्टेशनमध्ये गेले. त्यावेळी तिथे कोणताच कर्मचारी नव्हता, त्यामुळे ते आत असलेल्या ट्रांसफॉर्मरपर्यंत गेले. ट्रांसफॉर्मरमधून आलेल्या तारांमुळे हे या तिघांना जोराचा शॉक लागला आणि अचानक आग लागली. यांत त्या तिघांचाही जळून मृत्यू झाला.


आग शांत झाल्यावर लोकांना दिसलेमृदेह

विजेचा झटका लागताच ट्रांसफॉर्मरमध्ये आग लागली, ते पाहून आसपासच्या लोकांनी पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला याची सुचना दिली. आगीमुळे कोणालाच माहिती नव्हते की, त्यात तिघे मुले अडकले आहेत. काही वेळानंतर आग शांत झाली आणि त्यात मुलांचा मृत्यू झाल्याचे कळाले. त्यानंतर लोकांनी जोरदार विरोध प्रदर्शन केले. ग्रेटर नोएडा सीओ श्वेताभ पांडेने या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...