आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Three Consecutive Centuries, Only A Captain; Bumraha\'s Sacrificial Slogan

सलग 3 शतके,काेहली एकमेव कर्णधार; बुमराहचा बळींचा चाैकार:चाैथा वनडे हाेणार मुंबईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नंबर वन जसप्रीत बुमराहच्या  (४/३५)  धारदार गाेलंदाजी  अााणि विराट काेहलीच्या (१०७) शतकानंतरही टीम  इंडियाचा  सामना जिंकण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. काेहलीचे (१४०, १५७* १०७) मालिकेतील हे सलग तिसरे शतक ठरले. असे करणारा ताे जगातील एकमेव कर्णधार ठरला.  युवा गाेलंदाजांच्या बळावर पाहुण्या विंडीजने शनिवारी तिसऱ्या वनडेत यजमान टीम इंडियाचा पराभव केला. विंडीजने ४३ धावांनी सामना जिंकला. यासह विंडीजने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. अाता  चाैथा वनडे सामना साेमवारी मुंबईत हाेईल. 


शाई हाेपच्या (९५) शानदार अर्धशतकाच्या बळावर विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २८३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ४७.४ षटकांत अवघ्या २४० धावांवर अापला गाशा गुंडाळावा लागला. यासह विंडीजने यजमान भारताची घरच्या मैदानावरील विजयी माेहीम राेखली. 


 विंडीजच्या हाेपचा शतकाचा प्रयत्न अपयशी ठरला. विंडीजच्या इतर फलंदाजांचा फार काळ मैदानावर निभाव लागला नाही. भारताकडून कुलदीपने दाेन विकेट घेेतल्या. भुवनेश्वर, अहमद अाणि  चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.  


नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या विंडीजला चांगली सुरुवात करता अाली नाही. नंबर वन बुमराहने टीमला पहिली विकेट मिळवून दिली. 

 

काेहलीचा झंझावात व्यर्थ 

भारताच्या काेहलीने झंझावाती शतकी खेळी केली. त्याने ११९ चेडूंमध्ये १० चाैकार अाणि एका षटकारासह १०७ धाववा काढल्या. त्याचे हे मालिकेतील सलग तिसरे शतक ठरले. अशी कामगिरी करणारा ताे पहिला कर्णधार अाणि जगातील दहावा फलंदाज ठरला. हे त्याचे वनडेचे ३८ वे शतक अाहे. तसेच प्रत्युत्तरातील २३ वे शतक ठरले. याशिवाय अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६२ वे शतक त्याने अापल्या 
नावे केले.

 

बुमराहचे चार बळी : भारताकडून वेगवान गाेलंदाज बुमराह चमकला. त्याने सामन्यात अापल्या भेदक माऱ्याने विंडीजचे कंबरडे माेडले. त्याने सामन्यात ३५ धावा देताना चार बळी घेतले. त्याने हा पराक्रम वनडे करिअरमध्ये चाैथ्यांदा गाजवला. यासह त्याला अापला दबदबाही कायम ठेवता अाला.  त्याला दुखापतीमुळे  सुरुवातीच्या दाेन सामन्यांत खेळता अाले नाही. मात्र,  मिळालेल्या संधीचे त्याने साेने केले. अाता पुढचा सामना गाजवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

 

बातम्या आणखी आहेत...