आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी दगडाने ठेचून केली हत्या; मग एकाच बाइकवर मृतदेहाला घेऊन जात होते 3 जण, पोलिसांनी पाहताच घडले असे काही...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जिल्ह्यातील थेऊरमध्ये व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
आज(20 सप्टेंबर) पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास थेऊर गावातील हेड कॉन्सटेबल संदीप सुरेश देवकर हे आपल्या दोन सहकार्यासोबत खाजगी वाहनाने रात्री गस्तीवर अशताना, त्यांना एकाच गाडीवर चार जण जात असल्याचे दिसले. यावेळी गाडीवरील एक व्यक्तीचे डोके प्लास्टिक गोणीने झाकलेल होते आणि त्याच्या अंगावर रक्तही दिसत होते. 

हे दृष्य पाहून देवकर यांना शंका आली आणि त्यांनी सोबत असलेल्या 2 होमगार्डच्या मदतीने त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे कळताच आरोपींनी थेऊर फाट्याजवळ गोणीने झाकलेल्या व्यक्तीला टाकून तेथून पळ काढला. त्यानंतर देवकर यांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करत आरोपींना पकडले. आरोपींची चौकशी केली असता, येरवडा परिसरातील संगम वाडी रोडवर किरकोळ कारणावरुन मृत भारत राजू बढे (वय 24 रा. कासार वाडी,पुणे) याला दगडाने ठेचून खून केल्याचे त्यांनी कबुल केले. पोलिसांनी त्या तिनही आरोपींना पोलिस स्टेशनमध्ये आणले असून, अशोक संतोष आडवाणी (वय 22 रा.पिंपरी,पुणे
), अक्षय दिलीप पवार (वय 19 रा. वरवंट,दौंड) आणि विजय संतोष पवार (वय 19 रा. वरवंट,दौंड) अशी आरोपींची नावे आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...