आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसांच्या मुलीच्या नॅपीमध्ये घुसला विषारी विंचू, 7 वेळा घेतला चावा, आईला माहितीच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विटोरिया दा कॉन्क्विस्टा. ब्राजीलमध्ये एका 3 दिवसांच्या मुलीसोबत भयानक अपघात झाला. मुलीच्या नॅपीमध्ये विषारी विंचू घुसला. त्याने मुलीला 7 वेळा चावा घेतला. यानंतर तो मुलीच्या नाळेला चिटकला. यानंतर मुलीच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. मुलीला विंचू चावला हे आईला माहितीच नव्हते. जेव्हा मुलीला हॉस्पिटलमध्ये चेकअप करण्यासाठी नेले, तेव्हा कपडे काढताना तिच्या नॅपीमधून विंचू निघाला. हे पाहून सर्वच शॉक होते. मुलीला तात्काळ अँटी-कॉर्टिकोस्टेरॉयड सीरमचे सहा इमरजेंसी डोज देण्यात आले. तेव्हा तिचे प्राण वाचले. 


विंचू चावला हे आईला माहितीच नव्हते 
- ही घटना बहिया स्टेटच्या विटोरिया दा कॉन्क्विस्टा येथे घडली. फर्नान्डाने आपल्या 3 दिवसांच्या मुलीला अंघोळ घालून नॅपी घातली. यानंतर दोन मिनिटांनीच तिला काही तरी गडबड असल्याचे वाटले.
- मुलीच्या तोंडातून फेस येत होता, तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. फर्नान्डाला वाटले की, सोफिया खुप नाजुक आहे आणि तिला दूध पिण्यात अडचण येते. यामुळे असे होत असेल. 
- मुलीच्या नॅपीमध्ये विंचू आहे हे फर्नान्डाला माहितीच नव्हते. मुलीची तब्येत बिघडत असल्यामुळे ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. डॉक्टरांनी मुलीचे चेकअप केल्यावर तिला अपचन झाले असे त्यांना वाटले.
- येथील स्टाफला विंचू दिसलाच नाही. मुलीची तब्येत बिघडत चालली होती. तिचे हार्टबीट फास्ट झाले होते. तोंडातून फेस येत होता. 

 

विंचू पाहून घाबरले डॉक्टर 
यानंतर यूनिटमधील डॉक्टरांनी सोफियाला (बाळाला) आपल्या कारमधून म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये नेले. येथे चेकअप करण्यासाठी डॉक्टरांनी तिचे पुर्ण कपडे काढले. तेव्हा नॅपीमध्ये विंचू मिळाल.
- फर्नान्डाने सांगितले की, हे पाहूनच मी शॉक्ड राहिले आणि जोरजोरात रडू लागले. डॉक्टरही घाबरले होते. त्यांनी गार्डच्या मदतीने विंचू काढला आणि उपचार सुरु केले.
- सोफियाला तात्काळ अँटी-कॉर्टिकोस्टेरॉयड सीरमचे सहा इमरजेंसी इंजेक्शन दिले गेले आणि तीन दिवस इन्टेंसिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आले. बाळ पुर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. आता मुलगी तीन आठवड्यांची झाली आहे आणि स्वस्थ आहे. 


डॉक्टर याला चमत्कार मानत आहेत 
एवढ्या उशीरा उपचार मिळाल्यानंतरही मुलीचे प्राण वाचले यामुळे डॉक्टर्स याला चमत्कार मानत आहेत. बहिया हेल्थ सेक्रेट्रिएट इन्फॉर्मेशन सेंटरचे डायरेक्टर डेनियल रेबुओ यांनी सांगितले की, सात वर्षांच्या मुलाला जर विंचू चावला तर 2 तासांच्या आत त्याच्यावर उपचार होणे गरजेचे असते. या काळात रक्तामध्ये विष पसरते. हे औषधांनी कंट्रोल करणे सोपे असते. परंतु जास्त उशीर झाल्यावर विष कंट्रोल करणे अवघड असते. 

 

बातम्या आणखी आहेत...