आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीमुळे शहरात तीन दिवस दारुबंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ८ डिसेंबर ते १० डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण दिवस दारुबंदी (ड्राय डे) जाहीर करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी हा अादेश काढला आहे. शहरात प्रभागनिहाय १७ भरारी पथके तैनात केली असून मद्याची अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच मतदारांना प्रलोभनं दाखवणाऱ्या आर्थिक घडामोडींवरही लक्ष असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. 

 

पोलिस दल, आचारसंहिता कक्ष व भरारी पथकांनी आतापर्यंत ७ हजार ४५८ वाहनांची तपासणी केली. शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर तपासणी केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीत घडणाऱ्या अनुचित प्रकारांना अाळा बसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. आचारसंहिता कक्षाने आतापर्यंत शहरात निघालेल्या २११ अनधिकृत रॅली आणि ८१ सभांवर कारवाई केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आक्षेपार्ह भाषणाबद्दल आमदार अनिल राठोड व केतन गुंदेचा यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. त्याबाबत भाषणाच्या छायाचित्रण पडताळून संबंधित तक्रारीचा अहवाल पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाला पाठवला आहे. तसेच मोठ्या सभांचे छायाचित्रण पडताळून खर्चाच्या अनुषंगाने तसा अहवाल खर्च तपासणी समितीकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...