आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला. रत्नजडीत सोन्याचा मुकुट चोरीला, पोलिसांचा कर्मचार्‍यांवर संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपती- देशविदेशातील भविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालाजी तिरुपती मंदिरात चोरट्यांनी हात साफ केले आहेत. गोविंदराजा स्वामी मंदिरातील रत्नजडीत सोन्याचा मुकुट चोरीला गेला आहे. मुकुटचे वजन 1.3 किलोग्रॅम होते. ही घटना शनिवारी (ता.2) सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणी मंदीर प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. मंदिरात काम करणाऱ्यांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

 

तिरुपती देवस्थान मंदिराचे संयुक्त कार्यकारी अधिकारी पी भास्कर यांनी दिलेली माहिती अशी की, गोविंदराजा स्वामी मंदिरातील 18 मंदिरांपैकी एका मंदिरातील सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याचे एका पुरोहिताच्या लक्षात आले. या मुकुटमध्ये तीन रत्न (हिरे) बसवलेले होते. चोरीला गेलेल्या मुकुटांची किंमत तब्बल 1.5 कोटी एवढी आहे.

 

या प्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...