आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मिळालेली माहिती अशी की, हसनाबाद ते तळेगाव रस्त्यादरम्यान असलेल्या खादगाव फाट्याजवळ दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला. योगेश जाधव, रवींद्र बन्सी मते, योगेश काकासाहेब मानकापे हे तिघे हसणाबाद गावाकडून औरंगाबादकडे दुचाकीवरून जात होते. तळेगावकडून जुबेर शेरुखा पठाण, शेरुखा मोहम्मद पठाण हे दोघे दुसर्या दुचाकीवरून येत होते. खादगाव फाट्याजवळ दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. जुबेर शेरुखा पठाण (वय- 28, रा.हसनाबाद) शेरुखा पठाण व योगेश जाधव (रा. जातेगाव) या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. योगेश मानकापे आणि रवींद्र बन्सी मते हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.