Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Three died in road accident

हायवा ट्रक व दुचाकीचा अपघात; एक जण जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रतिनिधी | Update - Apr 16, 2019, 10:08 AM IST

एकाच कुटुंबातील बाप लेकीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

  • Three died in road accident

    कन्नड- तालुक्यातील रेलतांडा रोडवर औराळाच्या यात्रेहून दुचाकीवरून परत येताना दगड वाहणाऱ्या हायवा ट्रकची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    प्रमोद अशोकराव गायकवाड (२८, रा. अंधानेर), संदीप बाळू गायकवाड (३०, रा. बाभुळगाव), अनुसया संदीप गायकवाड(४, रा. बाभुळगाव ता.वैजापूर) हे कन्नड तालुक्यातील औराळा येथे यात्रेला गेले होते.
    सायंकाळी दुचाकीवरून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून दगड वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक एमपी ३९ एच १७७२ ची धडक बसून झालेल्या अपघातात प्रमोद गायकवाड रा. अंधानेर हा जागीच गतप्राण झाला तर संदीप गायकवाड व अनुसया गायकवाड यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात नेले असता उपचार दरम्यान मृत्यू झाला. संदीप गायकवाड हे सहा महिन्यांपूर्वीच अंधानेर येथे ट्रॅक्टर चालक म्हणून कामासाठी आले होते. प्रमोद गायकवाड यांच्यावर अंधानेर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर संदीप गायकवाड व त्यांची मुलगी अश्विनी गायकवाड याचा मृतदेह बाभुळगाव या मूळ गावी पाठवण्यात आले आहे.


    या प्रकरणी ट्रक चालक प्रदीपकुमार वैश्य मध्य प्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्ही.एम.आहेर करत आहे. अपघातात संदीप गायकवाड व अश्विनी गायकवाड हे दोघे एकाच कुटुंबातील बाप लेकीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Trending