आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर - परतूर तालुक्यातील भागडे सावरगाव येथे वीज कोसळून जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. गयाबाई गजानन नाईकनवरे, संदीप शंकर पवार आणि मंगल नागोराव चापले अशी मृतांची नावे आहेत. तर या दुर्घटनेत सुमन साहेबराव नाईकनवरे आणि एक आठ वर्षांचा लहान मुलगा जखमी झाला आहे. आज दुपारी दोन वाजती ही घटना घडली. 

सेवली परिसरातील भागडे सावरगाव शिवारात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीची कामे सुरू आहेत. रविवारी सकाळ पासूनच भागडे सावरगाव शिवारातील संदीप पवार यांच्या शेतात सोयाबिन काढणीचे काम सूरू होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरु झाल्याने पावसापासून बचाव होण्यासाठी शेतातील लिंबाच्या झाडाखाली सर्वांनी आसरा घेतला.  मात्र त्याच दरम्यान दुर्दैवाने त्या झाडावर वीज कोसळली. बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर जखमींना ताबडतोब पुढील उपचारासाठी दवाखान्यात रवाना करण्यात आले.

या दुर्घटनेत एक ६५ वर्षीय महिला आणि दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहेत. तर गयाबाई गजानन नाईकनवरे (53) रा.भागडे सावरगाव, संदीप शंकर पवार (30), मंगल नागोराव चापले (36) दोघेही रा. सेवली यांचा मृत्यू झाला आहेत.