आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये तिहेरी हत्याकांडाने खळबळ, तरुणाने मित्रासह त्याच्या आई-वडिलांचा केला खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद  - चिकलठाण्यामधील चौधरी काॅलनीतील महादेव मंदिराच्या जवळील गल्लीत एकाच कुटुंबातील तिघांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. भगवान दिनकर बोराडे (२५), दिनकर भिकाजी बोराडे(५५), कमलाबाई दिनकर बोराडे (५०) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तर अमोल भागीनाथ बाेर्डे (२३) असे आरोपीचे नाव आहे. त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. अमोल व भगवान अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. अमोलचा भगवानच्या बहिणीवर डोळा होता. त्यातून दाेन्ही कुटुंबात वाद होता. त्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, अमोल मनोरुग्ण असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

प्रत्यक्षदर्शी, गल्लीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोलचे घर बोराडेंच्या घरापासून ६० ते ७० मीटर अंतरावर आहे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आईने वाढलेल्या जेवणाच्या ताटावरून तो उठला. आई, वडील आणि लहान्या पुतणीला घरात कोंडले. त्यानंतर थेट बोराडे यांचे घर गाठले. आतून दरवाजा बंद केला आणि तिघांच्या अंगावर चाकूने सपासप वार केले. तिघांचा जीव जाईपर्यंत तो त्यांना भोसकत होता. त्यानंतर त्याने बोराडेंच्या घराचा दरवाजा लावला आणि काही अंतरावर कमरेला चाकू लावून तंबाखू खात उभा राहिला. त्याचा हा अवतार आणि घरातील आरडाओरड ऐकून स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अमोलला ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली.सविस्तर. दिव्य सिटी
 

बहीण कामाला गेली होती म्हणून वाचली :
त बोराडेंच्या कुटुंबात पाच जण आहेत. त्यातील तिघांची हत्या झाली. मोठी मुलगी विमल कामासाठी बाहेर गेली होती. तर तिची मुलगी घराबाहेर खेळत असल्याने वाचली. 
 
 

औरंगाबादमध्ये दोन दिवसात चार खून
दरम्यान, औरंगाबाद शहर हे गुन्हेगारीकडे वळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण, सोमवारी संध्याकाळी शहरातील पडेगाव भागात नशेच्या गोळ्या घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दोन आरोपींनी आपल्या मित्राचा भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. सय्यद शाकेर अली सय्यद नासेर अली(25, रा. रा. कासबंरी दर्गा, पडेगांव ), शेख दाऊद ऊर्फ शाहरुख पिता नजमोद्यीन आणि त्याचा भाऊ सय्यद शहजाद अली सय्यद नासेर अली असे आरोपींची नावे आहेत. शाकेर व जमीर यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. सोमवारी तिघांनी सय्यदला कासंबरी दर्गा परिसरात बोलावले. तिथे त्यांनी त्याला नशेच्या गोळ्या घेण्यासाठी पैशांची मागणी केली. पण, त्याने नकार दिला. त्यातून वाद झाला व तिघांनी त्याच्या मांडी आणि पोटात चाकू भोसकला. त्याला काही वेळाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.