आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पथ्रोट (जि. अमरावती) : पथ्रोट येथील निखिल दिलीप चुके (२२) व अंजनगाव सुर्जी येथील सुरेश बळीराम आवंडकर (५२) या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी उघडकीस आल्या. पथ्रोट येथील निखिल चुके याच्याकडे दीड एकर शेत आहे. शेतीवर ४० हजारांचे कर्ज होते. अंजनगाव सुर्जीतील सुरेश आवंडकर यांचा मृतदेह पथ्रोटनजीकच्या शिंदी बोराळा शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत मंगळवारी आढळून आला. आवंडकर यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. अतिवृष्टीने तूर-कपाशीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांच्या दोन मुली लग्नाला आल्या होत्या.
पातूर : अस्मानी संकटामुळे पिंपळडोळी येथील तुळशीराम नामदेव शिंदे (६२) या आदिवासी शेतकऱ्याने नवेगाव वनविभागाच्या जंगलात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी नवेगाव वनविभागाच्या जंगलात शिंदे यांचा मृतदेह सापडला.
प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून मलकापुरात शेतकऱ्याचा गळफास
करमाड : जमिनीचा फेरफार घेण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने वैतागून तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मलकापूर (ता. औरंगाबाद) येथे सोमवारी रात्री उघडकीस आली. संतोष रामचंद्र जाधव (३२, रा. राजे संभाजीनगर, हर्सूल, औरंगाबाद)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी फिर्यादी दीपक जाधव यांच्या तक्रारीवरून मंडळ अधिकारी के. डी. वाघ, तलाठी श्रीमती एम. एस. कदम यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला.
शेतकरी निखिल चुके आणि सुरेश आवंडकर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.