आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन फूट उंची असणाऱ्या गणेशने MBBS ला प्रवेश घेण्यासाठी घेतली होती सुप्रीम कोर्टात धाव, अखेर विजय मिळाला; गिनीज बुकमध्ये होणार नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावनगर (गुजरात) - तीन फूट उंचीचे गणेश विठ्ठलभाई बारैया यांचा भावनगर मेडीकल कॉलेजमध्ये गुरुवारी पहिला दिवस होता. मेडिकलला प्रवेश घेण्यासाठी गणेश यान कायदेशीर लढाई लढावी लागली होती. वैद्यकीय पदवी घेणारे कमी उंचीचे म्हणून त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात येणार आहे. 
 

स्वप्न साकारण्यासाठी शैक्षणिक आणि कायदेशीर लढाई दिली
गणेशने सांगितले की, कॉलेजमधील पहिला दिवस चांगला राहीला. सर्व सहकारी आणि डॉक्टरांना उत्साहात स्वागत केले. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी शैक्षणिक आणि कायदेशीर दोन्ही ठिकाणी लढा दिला. यामुळे आज मी आनंदी आहे. मी सर्वांचे आभार मानतो कारण त्यांच्या मदतीशिवाय माझे हे स्वप्न पूर्ण झाले नसते.  
 

NEET मध्ये मिळाले होते 223 गुण
गणेशला 2018 मध्ये NEET प्रवेश परीक्षेत 223 गुण मिळाले होते. पण कमी उंची असल्यामुळे त्यांना कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यावेळी त्यांचे वजन 14 किलोग्राम होते. गणेशने 12 वीत (विज्ञान शाखा) 87% गुण प्राप्त केले होते. 
 

सुप्रीम कोर्टात जिंकली लढाई : 
शिक्षक आणि शाळेने आपल्या गुणवंत विद्यार्थ्यासाठी सुप्रीत कोर्टाचे दार ठोठावले होते. याठिकाणी गणेश आपल्या हक्काची लढाई जिंकले आणि आज त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.