National / चुकीच्या ट्रेनमध्ये चढलेले 6 मित्र थोड्या वेळानंतर ट्रॅकवर उतरून स्टेशनकडे परत येत होते, मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेन खाली येऊन तिघांचा मृत्यू


काकरा खाडी ब्रिजवरून पायी चालत उधनाकडे जात होते, 11 वर्षांपूर्वी याच ब्रिजवर 16 जण ट्रेनखाली आली होते

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 01:45:00 PM IST

सुरत(गुजरात)- काकरा खाडी ब्रिजच्या रेल्वे ट्रॅकवर चालत जात असलेल्या राजस्थानच्या तिघांचा शनिवारी ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला. तिघेही राजसमंदचे रहिवासी होते. तेथील सहा तरुण राजकोटमध्ये नोकरी करत होते आणि आता वलसाडमध्ये नवीन नोकरी जॉईन करण्यासाठी अजमेर-पुरी एक्सप्रेस बदलून सूर्यनगरी एक्सप्रेस मधून जात होते.


ट्रेन सुरू झाली आणि काही वेळानंतर त्यांना ही ट्रेन वलसाडला थांबत नसल्याचे कळाले. काही वेळेनंतर ट्रेनची गती कमी झाल्यामुळे ते उधनाजवळ उतरले आणि पायी चालत रेल्वे ट्रॅकवरून उधना स्टेशनकडे येत होते. खाडी ब्रिजवरून जाताना मागून येणाऱ्या कर्णावती एक्सप्रेसने तिघांना उडवले, यात कुलदीपचा जागीच मृत्यू झाला.


तिघांचे वय 18 ते 19 वर्षे
प्रवीण नारायणचा हॉस्पीटलमध्ये काही वेळेनंतर मृत्यू झाला तर प्रवीण धीरसिंहचा शनिवारी मृत्यू झाला. तिघांचेही वय 18 ते 19 वर्षे होते, तर इतर तिघे ब्रिजच्या मागे असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. काकरा खाडी ब्रिजवर 27 फेब्रुवारी 2008 ला कच्छ एक्सप्रेसखाली सापडल्याने 16 जणांचा मृत्यू झाला होता.


ट्रेनचा वेग त्यांच्या पळण्यापेक्षा जास्त होता
तिघांनी 10 मीटर लांब ब्रिजचा अंदाजे 7 मीटर भाग पार केला होता, पण आम्ही ब्रिजवरदेखील पोहोचलो नव्हतो. इतक्यातच मागून वेगाने ट्रेन आली, तेव्हा आम्ही ओरडलो. त्यांना मागेही येता येत नव्हते आणि इकडे-तिकडेही जाता येत नव्हते. पुढे पळण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता, पण ट्रेन वेगाने असल्याने ते ट्रेन खाली सापडले.

X
COMMENT