आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रासह फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना नागपूरजवळील कामठी पोलिस हद्दीतील रनाळा-भिलगाव मार्गावरील एका फार्म हाऊसजवळ मंगळवारी रात्री घडली. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तीन विधिसंघर्षग्रस्त आरोपींना अटक केली असून पीडित मुलगी आणि तिच्या सहकाऱ्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलगी आणि तिचा साथीदार हे दोघेही अकरावीचे विद्यार्थी असून दोघे कळमना परिसरातील रहिवासी आहेत. मंगळवारी सायंकाळी पीडित मुलीचा मित्र तिच्या घरी पुस्तक आणायला गेला होता. त्यानंतर दोघे रनाळा-भिलगाव मार्गावर फिरत असताना तेथे तिघांनी त्यांना गाठले. दोघांना पट्ट्याने बेदम मारहाण केल्यानंतर त्यांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना घडली त्यावेळी मुलीचा मित्र सातत्याने नराधमांना सोडून देण्याचे आर्जव करत होता. या घटनेनंतर पीडित मुलगी व तिच्या मित्राने कुटुंबीयांच्या मदतीने कसेबसे कळमना पोलिस ठाणे गाठले. मात्र, घटनास्थळ कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांना कामठी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. तिघेही विधिसंघर्षग्रस्त आरोपी असल्याचे आढळून आले. यापूर्वी तिघांचा लुटमारीच्या अनेक घटनांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पीडित मुलगी व तिच्या मित्राला वैद्यकीय मदत पुरवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिला पोलिसावर सहकाऱ्याकडून अत्याचार

सातारा : सातारा पोलिस मुख्यालयातील कर्तव्य बजावत असलेल्या अक्षय सतीश कांबळे (मूळ रा.भरतगाव ता.सातारा) या पोलिसाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिसानेच याबाबत तक्रार दिली असून शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहेे. दरम्यान, संशयिताने एका पोलिस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित तक्रारदार महिला पोलिस आहेत. अक्षय कांबळे व तक्रारदार महिलेची पूर्वीपासून ओळख आहे. या ओळखीचा गैरफायदा घेऊन 'माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करतो,' असे आमिष त्याने महिलेला दिले. त्यानंतर अनेकदा पोलिस महिलसाेबत शाररिक संबंध ठेवले.

कांबळे याने तक्रारदार महिलेकडून ५० हजार रुपये उसने घेतले. गेल्या काही दिवसांपासून लग्नाबाबत ती विचारणा करत होती. मात्र, तो टाळाटाळ करू लागला. उसने घेतलेले पैसे मागितल्यानंतर ते पैसेही देण्यास संशयिताने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात अक्षय कांबळे याच्याविरुध्द बलात्कार व फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत.

आयटी तरुणीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत
 

पुणे : झारखंड येथून पुण्यातील आयटी कंपनीत नोकरीसाठी आलेल्या तरुणीसोबत अनैसर्गिक कृत्य करून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. प्रवीण नद्यालकर (२९, रा. हरिओम सोसायटी, येरवडा,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान घडला. पीडितेचे आई-वडील पुण्यात आल्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी झारखंड येथून नोकरीसाठी पुण्यात आली होती, तर प्रवीण हा नामांकित कंपनीत डाटा एंट्रीचे काम करतो. तरुणी पुण्यात आल्यानंतर तिची प्रवीणबरोबर ओळख झाली होती. त्यानंतर फिर्यादी व प्रवीण यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर प्रवीण याने तरुणीसोबत शरीरसंबंध आणि अनैसर्गिक कृत्य केले. त्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले. काही दिवसांनंतर त्याने तरुणीची माफी मागत लग्न करण्याचे आश्वासन देत पुन्हा बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...