आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित आघाडीचे ४६ नेते राष्ट्रवादीच्या गळाला, शरद पवार यांच्यासोबत तीन तास बैठक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १२ कलमी कार्यक्रम मान्य केला तर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी

मुंबई - वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले ४६ नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. या नेत्यांची शरद पवार यांच्याबरोबर रविवारी प्रदीर्घ बैठक झाली. या नेत्यांनी पवार यांच्यासमोर १२ कलमी कार्यक्रम ठेवला असून तो मान्य केला तर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बहुजन महासंघाचे अध्यक्ष व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली होती. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी खातेही उघडू शकली नव्हती. त्यामुळे आघाडीतील ४६ नेत्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पक्षाला रामराम ठोकला होता. या गटाची काँग्रेस व राष्ट्रवादीशी बोलणी चालू होती. रविवारी स्वत: शरद पवार यांनी वंचितच्या माजी नेत्यांशी चर्चा केली. फोर्ट परिसरातील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व छगन भुजबळ उपस्थित हाेते.बैठकीला वंचितचे माजी प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरसकर, वंचितच्या देखरेख समितीचे अध्यक्ष अर्जुन सलगर, हनुमंत वाक्षे, सदानंद माळी, बापूसाहेब हटकर, अब्दुल रौफ, बिस्मिल्ला खान आदी नेते हजर होते.या आहेत अटी

१. धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाची अंमलबजावणी करावी.


२. मुस्लिम आरक्षण कायदा मंजूर करावा.


३ भटके, विमुक्तांना घरकुल द्यावे.


४. ओबीसी, धनगर, भटके आणि मुस्लिम नेत्यांना पक्षात योग्य प्रतिनिधित्व मिळावे.


५. महिलांच्या योजनांना जिजाऊ, सावित्री, माता रमाई, अहिल्यादेवींची नावे द्यावीत.