आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान जाॅन्सन यांच्या मंत्रिमंडळात तीन भारतीय मंत्री, प्रीती पटेल यांना गृहमंत्री पद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलोक शर्मा	           प्रीती पटेेल		ऋषी सुनाक - Divya Marathi
आलोक शर्मा प्रीती पटेेल ऋषी सुनाक

लंडन - ब्रिटनचे नूतन पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांच्या टीममध्ये तीन भारतीय चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात ब्रेक्झिटच्या समर्थक प्रीती पटेल यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी साेपवण्यात आली आहे. नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांनाही स्थान देण्यात आले. पाकिस्तानवंशीय साजिद जावेद यांचाही समावेश करण्यात आला.


जाॅन्सन यांच्या टीममधील समावेशाबद्दल प्रीती पटेल म्हणाल्या, हा माझा गाैरव आहे. देशाच्या सुरक्षा व संरक्षणासाठी मी सर्वताेपरी प्रयत्न करणार आहे. गुन्हेगारीचा नायनाट करण्यावरही माझा भर असेल. मंत्रिमंडळ हे आधुनिक ब्रिटनचा चेहरामाेहरा दर्शवणारे हवे हाेते. बाेरिस यांचा तसा प्रयत्न आहे. आधुनिक ब्रिटनबराेबरच आधुनिक काॅन्झर्व्हेटिव्ह पार्टी या अर्थानेदेखील बाेरिस यांनी याेग्य ताे संदेश द्यावा, असे मत पटेल यांनी व्यक्त केेले हाेते. त्याच्या तासाभरानेच पटेल यांच्या नियुक्तीची घाेषणा करण्यात आली. ब्रिटनवर संपूर्ण विश्वास असलेल्या नेत्याची निवड देशाने केली आहे. नव्या आशा-आकांक्षांसह देशाची वाटचाल करणारे नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहताे.  ते भारतासह जगभरातील सर्व मित्रराष्ट्रांशी दृढ संबंध िनर्माण करून नवा देश घडवतील, अशी अपेक्षाही प्रीती पटेल यांनी व्यक्त केली.

 
लियाम फाॅक्स यांच्याकडे आंतरराष्ट्रीय व्यापार, पेन्नी माॅर्डाेंट हे नवे संरक्षणमंत्री असतील. टाेरी यांच्या मंत्रिमंडळातील अँड्रिया लिडसम यांना जाॅन्सन यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे उद्याेग खाते साेपवण्यात आले. गॅविन विल्यमसन हे नवे शिक्षणमंत्री असतील. 


आलोक शर्मा, सुनाक यांना संधी 
जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात आलोक शर्मा व ऋषी सुनाक यांचीदेखील वर्णी लागली आहे. आलोक शर्मा यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकासविषयक खाते सोपवण्यात आले आहे, तर सुनाक महसूल विभागाचे नवे प्रमुख असतील. रॉबर्ट बकलँड यांच्याकडे न्याय विभाग, ग्रँट शाप्स वाहतूकमंत्री झाले आहेत. पंतप्रधानांचे बंधू जो जॉन्सन हे व्यापार, ऊर्जा, उद्योग  विभागाचे प्रमुख असतील.

 

माेदी समर्थक गुजराती नेत्या 
४७ वर्षीय प्रीती पटेल या मूळच्या गुजरात समुदायातील असून त्या ब्रिटनमध्ये पंतप्रधान माेदी यांच्या समर्थक म्हणून आेळखल्या जातात. डेव्हिड कॅमरून यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्याकडे कनिष्ठ मंत्रिस्तरीय पदाची जबाबदारी साेपवली हाेती. २०१४ मध्ये त्या या पदावर हाेत्या. २०१६ मध्ये थेरेसा मे यांनी त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकास संबंध विभागाच्या प्रमुखपदी होत्या.