Home | International | Other Country | Three indian team won in NASA rover challenge

नासाच्या रोव्हर चॅलेंज स्पर्धेत भारताच्या तीन संघांनी जिंकले पुरस्कार, जर्मनी दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था | Update - Apr 17, 2019, 10:45 AM IST

यूपी, महाराष्ट्र आणि पंजाब संघांचा समावेश

  • Three indian team won in NASA rover challenge
    वॉशिंग्टन- नासाच्या ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज स्पर्धेत भारताच्या तीन संघांनी पुरस्कार जिंकले आहेत. यात गाझियाबादच्या काइट ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनने एआयएए नील आर्मस्ट्राँग बेस्ट डिझाइन अवॉर्ड जिंकला, तर मुंबईच्या मुकेश पटेल स्कूलने फ्रँक जो सेक्सटन मेमोरियल पिट क्रू अवाॅर्ड प्राप्त केला आहे. तसेच पंजाबच्या फगवाडा जिल्ह्यातील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने स्टेम एंगेजमेंट अवॉर्ड जिंकला. दरम्यान, नासाची अंतराळ प्रवासी सुनीता विल्यम्सने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. जर्मनीतील लीपजिंग येथील इंटरनॅशनल स्पेस एज्युकेशन इन्स्टिट्युशनने हायस्कूल विभागात ९१ गुण मिळवत प्रथम स्थान मिळवले, तर युनिव्हर्सिटी आॅफ प्युर्टो रिको मायागाज १०१ गुण मिळवून महाविद्यालय / विद्यापीठ विभागात प्रथम आले. स्पर्धेत १०० संघांनी भाग घेतला. यात भारत, पेरू, बांगलादेश व माेरोक्को यांसारख्या देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली.

Trending