Home | Divya Marathi Special | Three inspirational story 

तीन प्रेरणादायी कथा : आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर 26 जानेवारीला पद्मश्री पुरस्काराने सन्मान

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 28, 2019, 12:00 PM IST

२० व्या वर्षी जर्मनीतून येत ४१ वर्षे लाखो गायींची सेवा 

 • Three inspirational story 

  राजकुमारी देवी (शेतकरी काकू) | लोणचे विकल्याने बहिष्कृत केले; आता उत्पादन परदेशात
  आनंदपूर-
  बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील आनंदपूरच्या रहिवासी ६३ वर्षीय राजकुमारीदेवींना लोक शेतकरी काकू म्हणून ओळखतात. १९७४ मध्ये १५ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. दीर्घकाळ अपत्यप्राप्ती झाली नसल्याने टीका झाली. १९८३ मध्ये मुलगी झाली तरी टीका थांबली नाही. त्यांना घराबाहेर काढण्यात आले. मग त्यांनी शेती सुरू केली. लोणची-मुरब्बा तयार करून सायकलवर विकू लागल्या. तेव्हा समाजाने बहिष्कार टाकला. आता त्याच २५० महिलांसोबत लोणची परदेशात निर्यात करतात.

  केबीसीत संधी, मोदींकडूनही कौतुक
  २००६ मध्ये शेतकरी सन्मान मिळाला. येथेच शेतकरी काकू नाव मिळाले. व्हायब्रंट गुजरात-२०१३ मध्ये आमंत्रण. तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांचे मॉडेल सरकारी वेबसाइटवर टाकले. २०१५ व २०१६ मध्ये अमिताभ यांनी त्यांना केबीसीत आमंत्रित केले होते.

  पुढील स्लाइडवर वाचा- २० व्या वर्षी जर्मनीतून येत ४१ वर्षे लाखो गायींची सेवा

 • Three inspirational story 

  फ्रेडरिक इरिना ब्रूनिंग (सुदेवी माताजी) | २० व्या वर्षी जर्मनीतून येत ४१ वर्षे लाखो गायींची सेवा 
  नवी दिल्ली-
  जर्मनीच्या नागरिक फ्रेडरिक इरिना ब्रूनिंग (६१) १९७८ मध्ये २० व्या वर्षी थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, नेपाळ पर्यटनासाठी निघाल्या व वृंदावनात गोसेवेत रमल्या. यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. त्या म्हणाल्या, गायींवर अनेक पुस्तके वाचली व हिंदी शिकले. गाय दूध देणे बंद झाल्यानंतर लोक तिला सोडून देतात. अशाच गायींची मी सेवा करते.’ त्यांच्या कार्यामुळे त्यांना फ्रेडरिक सुदेवी माताजी या नावाने ओळखले जाते.  गोशाळा सुरू करून त्यांनी ४१ वर्षांत लाखो गायींची सेवा केली. सध्या १२०० गायी आहेत. 

   

  दर महिन्याला २५ लाखांचा खर्च
  गोशाळेत ६० लोक काम करतात. सर्वांचा उदरनिर्वाह गोशाळेवरच चालतो.  प्रत्येक महिन्याला २५ लाखांचा खर्च होतो. यातील काही रक्कम बर्लिनमधील वडिलोपार्जित संपत्तीतून मिळते. काही रक्कम देणगीतून प्राप्त होते. यातून खर्च भागवला जातो.

   

  पुढील स्लाइडवर वाचा- संपूर्ण कुटुंबीयांच्या अर्धशतकी गोसेवेचे  ‘पद्मश्री’ फलित

   

 • Three inspirational story 

  सय्यद शब्बीर (गोपालक)  |  संपूर्ण कुटुंबीयांच्या अर्धशतकी गोसेवेचे  ‘पद्मश्री’ फलित
  खाटीकखान्याच्या पारंपरिक व्यवसायात मन रमत नव्हते म्हणून वडिलांनी गोपालन सुरू केले. शब्बीर सय्यद यांनीही वयाच्या दहाव्या वर्षापासूनच गोसेवेचे व्रत घेतले. शब्बीर यांनी आता साठी ओलांडली आहे. त्यांची मुलेही गोसेवेतच आहेत. अर्धशतकाहून अधिक काळ गोसेवा करणाऱ्या दहिवंडी (ता. शिरूर) येथील शब्बीर सय्यद यांचा नुकताच ‘पद्मश्री’ने सन्मान करण्यात आला.    

   

  पद्मश्री काय, माहीतही नव्हते...
  १०० गायी सांभाळताना चारा- पाण्यासाठी शब्बीर यांना संघर्ष करावा लागतो. डोंगर, माळरानावर गायींना चरण्यासाठी न्यावे लागते. रोज किमान १५ हजार लिटर पाणी लागत असल्याने यासाठी त्यांना कसरत करावी लागते. पद्मश्री म्हणजे काय हे त्यांना माहीतही नव्हते.शिरुरपासून जवळ असलेले दहिवंडी गाव देशाच्या नकाशावर चमकले ते सय्यद शब्बीर यांच्यामुळे. शुक्रवारी देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री' त्यांना मिळाला. शब्बीर शेख यांच्या गोपालनाच्या कामाची थेट राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आणि शब्बीर यांच्या घरासमोर शुभेच्छा देण्यासाठी अक्षरश: रीघ लागली आहे. 

   

  शब्बीर सांगतात... :

  वडिलांचा खाटिकखाना होता. पण त्यांचे मन या व्यवसायात रमले नाही. त्यांनी खाटिकखाना बंद करून गोपालन सुरू केले. मी दहाव्या वर्षांपासून गाई सांभाळतो आहे. वडिलांनी नियम घालून दिला की गाय विकायची नाही आणि गाईचं दूधही! तोच वारसा मी आणि मुलंही चालवत आहोत. आज सुमारे शंभर गाई आहेत. यातील १५ तरी दुभत्या असतील. मात्र आम्ही कधीच दूध विकत नाही. दूध वासरांनाच पिऊ देतो. परिसरातील डोंगरावर आणि शेतात गाई चारायला घेऊन जातो. शिरुर हा सातत्याने दुष्काळाचा सामना करणारा तालुका. त्यामुळे चारा आणि पाणीटंचाईचा नेहमीच सामना करावा लागतो. यंदा तर स्थिती भीषण आहे.
   
  अवघे कुटुंब गोसेवेत 
  शब्बीर यांना दोन मुले रमजान आणि युसूफ. शब्बीर व त्यांची पत्नी, दोन्ही मुले, दोन्ही मुलांच्या बायका असे एकूण १० सदस्य दिवसभर गोसेवेतच असतात. गोसेवेत रमलेल्या या कुटुंबाचा पद्मश्री जाहीर झाल्यानंतर आनंद गगनात मावत नव्हता. मोठ्या मुलाला शुक्रवारी दिल्लीहून कल्पना देण्यात आली तर रात्री ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातूनही माहिती मिळाली. 

   

Trending