आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या विमानातून तीन किलो सोन्यासह संशयित तरुण ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिल्लीहून पावणेआठच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून एका ३० ते ३५ वर्षांच्या तरुणाला केंद्रीय आैद्योगिक सुरक्षा दलाच्या ( सीआयएसएफ) जवानांनी थेट विमानात शिरून ३ किलो सोन्यासह ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत सीअायएसफ आणि सीमा शुल्क (कस्टम)विभागाचे अधिकारी त्याची विमानतळावरच चौकशी करत होते. त्याने विमानातून आणलेले सामान देखील जप्त करण्यात आले आहे. मात्र गोपनीय कारवाई असल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना देखील या पासून दूर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.


दिल्लीहून सायंकाळी एअर इंडियाचे दिल्ली- औरंगाबाद- मुुंबई असे विमान आहे. या विमानात हा तरुण बसला होता. रात्री सात वाजून ५० मिनिटांनी हे विमान औरंगाबादला आले. मात्र रोजच्या प्रमाणे लगेचच प्रवाशांना उतरवण्याची परवानगी देण्यात आली नाही. धावपट्टीवर किमान २० मिनिटे विमान थांबवण्यात आले आणि अगदी 'फिल्मी स्टाइल'ने सीअायएसफचे जवान विमानात शिरले आणि त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी 'दिव्य मराठी' शी बोलतांना ही हकिकत सांगितली. या बाबत औरंगाबाद विमानतळाचे व्यवस्थापक डि. जी साळवी यांना विचारले असता या बाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.


पैसेही असल्याची चर्चा
सीआयएसएफच्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्लीहूनच याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांचे पथक या ठिकाणी तयारच होते. विमान उतरताच ही कारवाई करण्यात आली आहे. या तरुणाकडे तस्करीचे ३ किलो सोने किंवा पैसे असल्याची चर्चा आहे. गोपनीयतेमुळे या तरुणाचे नाव सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. हा तरुण औरंगाबादचा असल्याची चर्चा आहे

बातम्या आणखी आहेत...