आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅशबॅक 2018 : बॉलिवूडमध्ये तिन्ही खान फ्लॉप, लो बजेट चित्रपट झाले हिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : वर्ष 2018 मध्ये बॉलिवूडचे तिन्ही खान, सलमान-आमिर-शाहरुख यांचे चित्रपट आले होते. सलमानची फिल्म रेस-3 ने बजेट (150 कोटी रु) पेक्षा जास्तची कमाई तर केली, पण याला क्रिटिक्स प्रेक्षकांची टीका झेलावी लागली. सलमानच्या फिल्मकडून जेवढी अपेक्षा असते, रेस-3 ची कमाई त्यापेक्षा कमीच होती. 

 

याचप्रमाणे आमिरची मल्टीस्टारर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सुद्धा फ्लॉप झाली. या चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये होते, आणि कमाई मात्र 150 कोटी रुपयेच झाली. शाहरुखच्या चित्रपट 'झिरो' ला बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची संघर्ष करावा लागतो आहे आणि या चित्रपटाचे बजेटच 200 कोटी आहे. 

 

अक्षय कुमारच्याही चित्रपटांनी (पॅडमॅन आणि गोल्ड) नेही तितके खास प्रदर्शन केले नाही जितकी अपेक्षा होती. दुसरीकडे मात्र याचवर्षी रिलीज झालेले 'सोनू के टीटू की स्वीटी', 'स्त्री', 'बधाई हो', 'अंधाधुन' आणि 'राजी' या चित्रपटांमध्ये मात्र कुणी स्टार नव्हता आणि याचे बजेटही कमी होते. मात्र या चित्रपटांनी आपल्या बजेटपेक्षा 5 पट जास्त कमाई केली आहे. या कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये आयुष्मान खुराना आणि राजकुमार राव असे अभिनेते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. यावर्षी आयुष्मानचे दोन चित्रपट आले 'अंधाधुन' आणि 'बधाई हो'. 

बातम्या आणखी आहेत...