आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसारवाडीजवळ कंटेनर-कार अपघातात तीन ठार, टोल वाचवण्यासाठी कंटेनर पैठणच्या आडमार्गी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण : पैठण -औरंगाबाद रस्त्यावरील इसारवाडी फाट्याजवळ कंटेनर व मारुती झेन कारच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात ढोरजळगाव (ता. शेवगाव जि. नगर) येथील पती, पत्नी व सासू असे तिघे जण जागीच ठार झाले.

पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील इसारवाडी फाट्याजवळ औरंगाबाद येथून भरधाव येणारे कंटेनर क्र.जी.जे.०६. ए.झेड. ६८५१ व कार क्र.महा.१२ सी.के. ३४६८ यांची पहाटे साडेचारच्या दरम्यान समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये कारचालक बाळासाहेब निवृत्ती डाके (४५) अंबिका बाळासाहेब डाके (४०) रा.ढोरजळगाव ता.शेवगाव हे पती,पत्नी व बाळासाहेब डाके यांची सासू सुमन रघुनाथ नरवडे (६५) रा. वरुड बुद्रुक ता.शेवगाव या जागीच ठार झाल्या.

टोल वाचवण्यासाठी कंटेनर आडमार्गाने....

कंटेनर चालक फरार झाला असून क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले अाहे. कंटेनर चालक दारूच्या नशेत होता असे कळते. कंटेनर सोलापूरला चालले होते. ते पाचोड मार्गी जाणे अपेक्षित असताना पाचोड जवळील टोल वाचवण्यासाठी हा मार्ग निवडला होता. तर कारमधील महिलेच्या तपासणीसाठी कांचनवाडी येथील रुग्णालयात पती व मुलीसोबत निघाली होती.