आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओहियो - अमेरिकेच्या सिनसिनाटी शहराच्या एका बँकेत गुरुवारी एका गनमॅनने अंधाधुंद फायरिंग केली. त्यात एक भारतीय तरुण आणि एका महिलेसह एकूण तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीही ऐकत नसल्याने त्याला गोळी घालण्यात आली. आरोपीने सर्वात आधी फाऊंटन स्क्वेअरजवळच्या फिफ्थ थर्ड बँकेबाहेर गोळीबार केला. त्यानंतर तो बँकेत शिरला आणि अंधाधुंद फायरिंग केली. अद्याप फायरिंगमागचे कारण समोर आलेले नाही. ओमर एनरिक सँटा पेरेज असे हल्लेखोराचे नाव होते.
मृतांमध्ये एक भारतीय
मृतांमध्ये एका 25 वर्षीय भारतीय तरुणाचाही समावेश आहे. पृथ्वीराज कांदेपी नाव असलेला हा भारतीय तरुण मूळचा आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील होता. कांदेपी बँकेचा कर्मचारी होता तो बँकेमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत होता. त्याचा मृतदेह भारतात पाठवण्याची तयार करण्यात आली आहे.
कशाचाही विचार न करता अंधाधुंद फायरिंग
फाऊंटन स्क्वेअरजवळच्या एका दुकानात काम करणाऱ्या इबोनी जिनयार्ड यांनी सांगितले की, गोळ्यांचा आवाज ऐकताच त्या इतर कर्मचारी आणि ग्राहकांसह जमिनीवर लोटल्या. गनमॅन त्यांच्या अगदी जवळ होता. त्यांची बाहेर पडण्याचा प्रयत्न केला सता तर त्याने त्यांनाही मारले असते, असे त्या म्हणाल्या. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो बँकेत प्रवेश करणार होता, त्याचवेळी एका व्यक्तीने अंधाधुंद फायरिंग सुरू केली. त्यावेळी एक महिला बँकेत शिरली. लोकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण तिने हेडफोन लावले होतेत्यामुळे महिलेला काहीही ऐकू आले नाही. आरोपीने तिचीही हत्या केली.
पुढे पाहा, हल्ल्यानंतरचे काही PHOTOS
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.