आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात नियोजित बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून 3 मजुरांचा मृत्यू, विधानसभेत गाजला मुद्दा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबई, पुणे आणि विदर्भासह अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे अपघाताचे वृत्त समोर येत आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या एका दुर्घटनेत 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. येथील नियोजित बांधकामाच्या ठिकाणी मजुरांवर पाण्याची टाकी पडली. या टाकीखाली दबल्याने त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. याच दुर्घटनेत आणखी 2 मजूर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

विधानसभेत गाजला मुद्दा

दरम्यान, नाशिक दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. विरोधकांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी असे आवाहन करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना त्याची गंभीर दखल घेतली. तसेच या घटनेचा सविस्तर तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.