आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्येच्या गायींना थंडीपासून वाचवण्याची तयारी, गायींना थ्री लेअर 'मखमली' कोट घातले जातील 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जिथे राममंदिर निर्मितीचा निर्णय झाला. तर आता अयोध्येतील गायींचेही चांगले दिवस येणार आहेत. झाले असे की, महानगरपालिका गायींना थंडीपासून वाचवण्यासाठी 'मखमली' कोट घालण्याची तयारी करत आहे. अयोध्या महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. नीरज शुक्ला म्हणाले, 'बैसिंह येथील गौशाळेमध्ये गायींना थंडीपासून वाचवण्यासाठी 'काऊ कोट' ची व्यवस्था केली जात आहे. ती दोन तीन टप्यांमध्ये होईल. कारण येथे गायीची संख्या 1,200 आहे. यापूर्वी त्यांच्या 100 वासरांसाठी कोट तयार केले जात आहेत. 


काऊ कोट तीन लेअरमध्ये आहे. पहिल्या लेअरमध्ये मऊ कपडा, त्यानंतर फोम आणि नंतर ज्यूट लावले जात आहे. आधी कापड यासाठी लावला जात आहे जेणेकरून तो टोचू नये. फोम यासाठी की, त्यामुळे पाणी शोषले जावे आणि उब मिळावी. याचे सॅम्पल तयार झाले आहे.  

किंमत 250 रुपयांपासून 300 रुपये... 


नोव्हेंबर संपताच येथे डिलिव्हरी होऊन जाईल. याची किंमत 250 रुपयांपासून ते 300 रुपयांमध्ये आहे. नर आणि मादी पशूंसाठी वेगवेगळे डिझाईन आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...