आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री भानुप्रियाच्या घरातून तीन अल्पवयीन मुलीची सुटका, लैंगिक शोषणाचा आरोप, मानवी तस्करीचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- दाक्षिणात्य अभिनेत्री भानुप्रिया हिच्या घरातून तीन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. एका मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी (ता.4) चाइल्ड लाइनच्या अधिकार्‍यांनी चेन्नईतील भानुप्रियाच्या घरी छापा टाकला. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली.

 

आंध्रप्रदेश पोलिसांनी भानुप्रियाच्या भावाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे भानुप्रियाने पीडिता आणि तिच्या आईवर चोरीचा आरोप केला आहे.

 

अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आंध्रप्रदेशातील समालकोट पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीने आपल्या घरात जबरदस्तीने डांबून ठेवले होते.एजन्टने पीडितेला 10 हजार रुपये पगार देण्याचे आमिष दाखवले होते. अभिनेत्रीने मुलींना मारहाण केल्याचाही आरोप आहे. पीडितेची आई 18 जानेवारीला मुलीला भेटायला गेली होती. परंतु, तिला मुलीला भेटू दिले नाही.

 

मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय..
बालकहक्क कार्यकर्ता अच्युत राव यांनी याप्रकरणी राज्य आणि राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोगाला पत्र लिहिले आहे. आयोगाच्या आदेशानुसार अभिनेत्री भानुप्रियाच्या घरी कारवाई करण्‍यात आली आहे. बालक कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भानुप्रियाला अटक  करण्याची मागणीही अच्युत राव यांनी केली आहे.

 

राव म्हणाले, अभिनेत्रीच्या घरी अल्पवयीन मुली आढळल्याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी. राव यांनी मानवी तस्करीची शक्यताही वर्तवली आहे.

 

अभिनेत्रीने पीडितेसह तिच्या आईवर केला चोरीचा आरोप
भानुप्रिया (52) हिने तेलगु, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. भानुप्रिया हिने पीडितेसह तिच्या आईवर चोरीचा आरोप केला आहे. मुलगी घरातून दागिने आणि गॅजेट्स चोरुन तिच्या आईला दिले. चोरी केलेले साहित्य परत करण्यास सांगितले असता, केवळ आयपॅड परत केल्याचेही अभिनेत्रीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नंतर मुलीच्या आईने कॅमेरा आणि घड्याळी परत केले.

बातम्या आणखी आहेत...