आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर ; निवडणूक आयोगालाही कळवले -हरिभाऊ बागडे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरोधात बंड करणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सातव्यांदा दिलेला राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यांच्यासह शिवसेनेच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (२८ मार्च) तिघांचेही राजीनामे मंजूर केले आहेत. सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, नांदेडचे प्रतापराव चिखलीकर यांचाही राजीनामाे देणाऱ्यांत समावेश आहे. यामुळे सेनेचे विधानसभेतील संख्याबळ आता ६३ वरून ६० वर आले आहे.   


कन्नडमधून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार जाधव यांनी मागील तीन वर्षांपासून खैरे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा पुकारला आहे. एवढेच नव्हे तर राजकीय पक्षाची स्थापनाही केली. खैरेंच्या विरोधात गुरुवारी (२८ मार्च) त्यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी (२६ मार्च) विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिला नसता तर सेनेचे आमदार असतानाही सेनेचे अधिकृत उमेदवार खैरेंच्या विरोधात नामांकन दाखल केल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असती. पक्षाकडून सहा वर्षांसाठी निलंबित होण्याऐवजी त्यांनी बागडेंकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करणाऱ्या काकासाहेब शिंदेंच्या प्रति सहानुभूती व्यक्त करत त्यांनी सहाव्यांदा राजीनामा दिला होता. मात्र आतापर्यंत एकदाही तो मंजूर झाला नव्हता. या वेळी बागडे यांनी गुरुवारी राजीनामा मंजूर केला आहे.   

 

राजीनामे मंजूर, निवडणूक आयोगालाही कळवले  
होय, विधानसभा कामकाज प्रक्रियेतील नियम क्रमांक २९९ नुसार तिन्ही राजीनामे मंजूर केले आहेत. आता तिन्ही विधानसभांच्या जागा रिक्त आहेत. मी केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे. केवळ सहा महिने शिल्लक राहिल्याने पोटनिवडणुकीची शक्यता कमीच आहे.
-हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष  

 

लोकसभेच्या रिंगणात तिघेही सेनेचे आमदार :

चंद्रपूर येथून काँग्रेसने सेनेचे अरोरा येथील आमदार सुरेश धानोरकर यांना, नांदेडमधून भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना उतरवले आहे,  तर हर्षवर्धन जाधव औरंगाबादेतून अपक्ष उमेदवार आहेत.

बातम्या आणखी आहेत...