Home | Business | Business Special | Three months free salary on leaving the job and give 7 lakh ruppes to start business

नोकरी सोडल्यानंतर अॅमेझॉन देणार तीन महिन्यांचा मोफत पगार, सोबतच बिझनेस सुरू करण्यासाठी मिळणार सात लाख रूपये

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 04:02 PM IST

अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, पार्टटाइमर देखील करू शकतात अर्ज

 • Three months free salary on leaving the job and give 7 lakh ruppes to start business

  नवी दिल्ली - कोणतीही कंपनी साहजिकच आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते. पण एक अशी कंपनी आहे जी कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून व्यवसाय करण्यास सांगत आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून व्यवसाय करण्याची संधी देत आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरी ऐवजी डिलीवरी बिझनेस करण्याची कल्पना दिली आहे. अॅमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी सुरू करण्यसाठी 7 लाख रूपयांची मदत करणार आहे. जे लोक असे करतील अशा लोकांना कंपनीकडून 3 महिन्यांचा पगार देखील मोफत मिळणार आहे.


  कंपनीचा हा आहे उद्देश
  आपल्या सामानाची डिलीवरी आणखी गतिमान करण्याचा अॅमेझॉनचा मानस आहे. अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्सला सर्व ऑर्डर दोन दिवसांत मिळतात. अॅमेझॉनला या ऑर्डर एका दिवसात द्यायच्या आहेत. यासाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून व्यवसाय करण्याची ऑफर दिली आहे.


  पार्टटाइमर देखील करू शकतात अर्ज
  सध्या अॅमेझॉन आपल्या सामानच्या डिलीवरी पोस्ट ऑफर किंवा कुरिअरने करते. आता कंपनीला या डिलीवरी व्यवसायावरही आपला ताबा मिळवायचा आहे. यामुळे कंपनीने ही योजना आणली आहे. अॅमेझॉनची ही ऑफर पार्टटाइम आणि फुलटाइम दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी आहे. कंपनीने गेल्यावर्षी अशीच एक योजना सुरू केली होती. पण त्यात लष्कारातील निवृत्त लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनी 7 लाख रूपये देते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 200 लोकांनी डिलीवरी व्यवसाय सुरू केला आहे.

Trending