आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP Elections: मतदानाच्या ड्युटीला असताना एकाच दिवशी 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तिघांनाही हार्ट अटॅक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेशात इलेक्शन ड्युटीवर असलेल्या 3 निवडणूक अधिकाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार, या तिघांचाही मृत्यू एकाच दिवशी ड्युटी करत असताना हार्ट अटॅकमुळे झाला. मतदानाला सुरुवात झाली तेव्हा अवघ्या काही तासांतच गुना येथे ड्युटीवर असलेल्या एका अधिकाऱ्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर इंदूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले. एकानंतर एक राज्यभरात तीन अधिकाऱ्यांचा जीव गेला. निवडणूक आयोगाने तिन्ही मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10-10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

 

गुना जिल्ह्यातील बमोरी विधानसभा मतदार संघात एका मतदान केंद्रावर सोहनलाल ड्युटी करत होते. त्याचवेळी ते बाथरुमला गेले असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काहींच्या मते, ते मतदारांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवताना व्यवस्थित रांगा लावण्याचे प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांना हार्ट अटॅक आला. यानंतर मध्य प्रदेशातच इंदूर येथील एका मतदान केंद्रावर ड्युटी करत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना सुद्धा हार्ट अटॅक आल्याचे वृत्त समोर आले. त्या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यापैकी एकाचा वाटेत आणि दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 


कोण किती जागांवरून लढतेय...
मध्य प्रदेशात भाजप सर्वच 230 जागांवरून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने एक जागा आघाडीतील पक्ष लोकशाही जनता दलासाठी सोडून 229 जागांवर आपले उमेदवार उतरवले. आम आदमी पार्टी आणि सपाक्स असे पक्ष मध्य प्रदेशात पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. यात आपने 207, सपाक्सने 109, बसपने 227, गोंगपा 73 आणि समाजवादी पक्षाने 52 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. 


मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान
मिजोरममध्ये 40 जागांसाठी 8 राजकीय पक्षांनी एकूण 209 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यात सत्ताधारी काँग्रेस आणि मुख्य विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट सर्वच 40 जागांवर लढवत आहे. यानंतर भाजप 39, नॅशनल पीपल्स पार्टी 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर नशीब अजमावत आहे. निवडणुकीच्या रिंगणात 8 राजकीय पक्ष असले तरीही सद्यस्थितीला काँग्रेस, एमएनएफ आणि मिझोरम पीपल्स पार्टी या तीनच पक्षांचे आमदार आहेत. यात काँग्रेसकडे सर्वाधिक 34 आमदार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...