आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्पर गँग खबऱ्याचा खून प्रकरण, तिघांना जन्मठेप; टोळीमधून फुटलेल्या गुन्हेगारांचा समावेश 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- टिप्पर गँगला खबर देत असल्याच्या संशयावरून आणि बदला घेण्याच्या भीतीतून टोळीतील सदस्याचा खून करणाऱ्या तीन ओराेपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली. तिघेही आराेपी टिप्पर गँगमधून फुटून निघालेल्या टाेळीचे सदस्य आहेत. शुक्रवारी (दि. ११) अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी ही शिक्षा सुनावली. जून २०१६ मध्ये रात्री अंबडमध्ये अजिंक्य चव्हाण या रिक्षाचालकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. 

 

अभियोग कक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य संजय चव्हाण (रा. अंबड) याच्या खुनप्रकरणात आरोपी संदीप भालचंद्र वाघ, योगेश रघुनाथ मराठे, दिनेश राजाराम पाटील, योगेश दादाजी निकम, गणेश शेषराव घुसळे व एक विधिसंघर्षित बालक यांच्यावर खटला सुरू हाेता. हे सर्व टिप्पर गँगचे सराईत गुन्हेगार आहेत. टोळीत मतभेद झाल्याने वरील सर्वांनी दुसरी टोळी तयार केली हाेती. याच टोळीतील सदस्य मृत अजिंक्य चव्हाण हा टिप्पर गँगच्या छोटा पठाण आणि गण्या कावळ्या यांना माहिती देत असल्याचा संशय आरोपींना होता. या कारणावरून अजिंक्यचा डाेक्यात पिस्तूलातून गाेळी झाडून त्याचा खून करण्यात आला हाेता. याप्रकरणी संजय चव्हाण यांनी अंबड पोलिसांत तक्रार दिली होती. सहायक निरीक्षक संतोष खडके यांनी याबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी संदीप वाघ, योगेश मराठे, दिनेश पाटील यांना जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. योगेश निकम, गणेश घुसळे आणि विधिसंघर्षित बालकाचा या गुन्ह्यात सहभाग आढळून न आल्याने न्यायालयाने त्यांना मुक्त केले.

बातम्या आणखी आहेत...