Home | National | Other State | Three of a family ends life after handing over money to daughter for funeral

आणखी एक सामूहिक आत्महत्या! वडिलांसह भाऊ-बहिणीने दिला जीव, मरण्यापूर्वी दुसऱ्या मुलीकडे दिले होते अंत्यविधीचे पैसे

वृत्तसंस्था, | Update - Jul 16, 2019, 05:02 PM IST

चेन्नईत एकाच कुटुंबातील तिघांनी उचलले टोकाचे पाऊल

 • Three of a family ends life after handing over money to daughter for funeral

  चेन्नई - तामिळनाडूत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी सामुहिक आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 70 वर्षीय वडील धुरईराज, 42 वर्षीय मुलगी सेलवी आणि 37 वर्षांचा मुलगा गोपालकृष्ण यांचा समावेश आहे. यापैकी एकाने स्वतःला फासावर लटकवले. तर इतर दोघांनी विष घेऊन आयुष्य संपविले. या सर्वांनी आधीच आपल्या अंतिम संस्काराची व्यवस्था केली होती. मरण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच गोपालकृष्णा याने आपल्या दुसऱ्या एका बहिणीला स्वतःच्या अंत्यसंस्काराचे पैसे दिले होते.


  कुटुंबात होते एवढे दुःख...
  तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. 70 वर्षीय धुरईराज यांच्या पत्नीचे 20 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. ते आपली मुलगी सेलवी आणि मुलगा गोपालकृष्ण यांच्यासोबत एका गावात राहत होते. मोठी मुलगी सेलवी हिचा काही वर्षांपूर्वीच आपल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. तसेच ती आपल्या 22 वर्षांच्या मुलासोबत वडिलांसोबतच राहत होती. धुरईराज यांची आणखी एक मुलगी शांती विवाहित होती तसेच ती आपल्या पतीसोबत जवळपासच्या परिसरात राहत होती. गेल्या वर्षीच सेल्वीच्या मुलाने आत्महत्या केल्याने हे कुटुंब आतून खचले होते. कुटुंब प्रमुख पत्नीच्या निधनाच्या दुखात, सेलवीच्या मुलाची आत्महत्या आणि लग्न जमत नसल्याने गोपालकृष्ण सुद्धा डिप्रेस होता.


  आत्महत्येपूर्वीच केली अंत्यविधीची व्यवस्था
  शांतीने सांगितल्याप्रमाणे, तिचा भाऊ गोपालकृष्ण सोमवारी संध्याकाळीच तिची भेट घेण्यासाठी आला होता. गोपालकृष्णने शांतीच्या हातात 30 हजार रुपये रोख आणि घराची कागदपत्रे ठेवली. संकटाच्या काळात हे कामी येतील असे म्हणत तो घरातून निघून गेला. घरी पोहचल्याच्या अवघ्या काही वेळातच गोपालकृष्णने पंख्याला लटकून गळफास घेतला. तर सेलवी आणि धरईराज या दोघांनी विष प्राषण केले. दुसऱ्या दिवशी घरातून कुणीच बाहेर आले नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. पोलिसांना घटनास्थळी बोलावल्यानंतर त्यांनी दार तोडले. आत धरईराज आणि गोपालचा मृत्यू झाला होता. तर सेलवी बेशुद्धावस्थेत होते. तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच तिने प्राण सोडले. आपल्या भावाने या कारणासाठी पैसे आणि कागदपत्रे दिली हे आधीच माहिती असते तर ते घेतलेच नसते अशा विचारांनी शांतीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर अख्ख्या गावात शोककळा पसरली आहे.

Trending