Home | Maharashtra | Pune | Three old woman died in accident on Nagar-Kalyan national highway

सकाळी फिरायला गेलेल्या 3 वृद्ध महिलांना वाहनाने चिरडले, अपघातानंतर वाहनचालक फरार...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 02:57 PM IST

अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेतल आहेत

  • Three old woman died in accident on Nagar-Kalyan national highway

    पुणे- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन महिलांना अज्ञात वाहनाने धडक मारल्याने यात त्यांचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर गावाजवळ नगर-कल्याण महामार्गावर सकाळी 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला. मॉर्निंग वॉक करत असताना एका अज्ञात वाहनाने या महिलांना धडक दिली. यामध्ये तीनही महिलांची जागीच प्राणज्योत मावळली. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेतल आहेत.

    सकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास या तीन महिला रोजप्रमाणे फिरायला गेल्या होत्या. चालत असताना अचानक एका अज्ञात वाहनाने महिलांना धडक मारली. त्यानंतर वाहनचालकाने वाहनासह तेथून पळ काढला. अपघात झाल्यानंतर गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही महिलांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात मीराबाई सुदाम ढमाले (वय 60), कमल महादेव ढमाले (वय 62), चांगुणा रामभाऊ रायकर (वय 70) या महिलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाच घरातील दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तर ओतूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Trending