आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Three People Arrested For Infiltration In Ahemdnagar Military Camp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्कर हद्दीत घुसखोरी केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये तिघांना अटक...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- नगरमधील भिंगार येथे लष्कराच्या हद्दीत घुसखोरी करण्याऱ्या 3 संशयीतांना पोलिसांनी अटक केले. पकडण्यात आलेल्या आरोपीमध्ये दोघे उत्तरप्रदेशातील मिर्झापूरचे तर एकजण नगर जिह्य्तील पारनेरमधला आहे. विशेष म्हणजे या तिघांपैकी एकाने लष्करी वेश परिधान केला होता. पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.

 

गुरूवारी रात्री भिंगार येथील लष्करी कॅम्प भागात हे आरोपी संशयतीररित्या फिरत होते, आणि त्यापैकी एकाने लष्करी वेश परिधान केला होता त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

 

पोलिसांच्या चौकशी दरम्यान कळाले की, तिघांपैकी दोघे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील आहेत तर एकजण नगरमधील पारनेर येथील आहे. तिघांवर लष्करी परिसरात घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.