Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Three people die with two brothers in wall collapsing

अहमदनगर येथील घटना : भिंत कोसळून दोन सख्ख्या भावांसह तीन जणांचा मृत्यू

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 10:18 AM IST

घराचे बांधकाम सुरू असताना घडली घटना

  • Three people die with two brothers in wall collapsing


    नगर - अहमदनगर शहरामध्ये घराचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला. १ मजूर गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील सथ्था कॉलनीत रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.


    रोहन विजय फुलारे (२२), राहुल विजय फुलारे (२६) व गोविंद शंकर शिंदे (३२, सर्व रा. बुरूडगाव, ता. नगर) अशी मृतांची नावे आहेत. रोहन व राहुल हे दोघे भाऊ होते, तर गोविंद हा त्यांचा मेव्हणा होता. घराचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. बांधकाम पूर्ण झाले होते, परंतु घराभोवती असलेल्या कंपाऊंडच्या जुन्या भिंतीला प्लास्टर करण्याचे काम हे मजुर करत होते. त्यासाठी जुने प्लास्टर ड्रील मशीनने काढत असताना ड्रील मशीनच्या हादऱ्याने भिंत कोसळी. भिंतीच्या मलब्याखाली हे तिघेजण दबले गेले. कोतवाली पोलिस आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना मलब्याखालून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत दोन जणांनी प्राण सोडले होते, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. आणखी एक मजुर या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी काेतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Trending